शिंदे, फडणवीस, पवार, ठाकरेच नाही तर 'ही' नावंही CM पदाच्या शर्यतीत; शेवटचं नाव पाहाच

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Expected CM Chief Minister: राज्याने मागील पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यामुळेच 2024 च्या निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार याबद्दलची उत्सुकता कायम असून चर्चेत एक-दोन नाही तर तब्बल सात नावं चर्चेत आहेत. ही नावं कोणती ते पाहूयात...

| Nov 23, 2024, 06:10 AM IST
1/10

maharashtracm

पाच वर्षात तीन मुख्यमंत्री पाहणाऱ्या महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? चर्चेत तब्बल सात नावं

2/10

maharashtracm

राज्याच्या 15 व्या विधानसभेचा आज निकाल लागत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संघर्षपूर्ण लढत होण्याची दाट शक्यता एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे.   

3/10

maharashtracm

असं असतानाच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री कोण याबद्दलची बरीच चर्चा असून प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नेमके कोणते नेते आहेत हे पाहूयात...  

4/10

maharashtracm

एकनाथ शिंदे- विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुढेही मुख्यमंत्री राहतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे समर्थकांनी अनेकदा तशी इच्छा बोलून दाखवली आहे. शिंदेंच्या गटातील आमदार संजय शिरसाट यांनी एक्झिट पोलनंतरही ही इच्छा बोलून दाखवली होती.  

5/10

maharashtracm

देवेंद्र फडणवीस - भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यास देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावं अशी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी आहे. राज्यात सध्या फडणवीसांपेक्षा मोठा भाजपाचा कोणताही नेता नाही. प्रशासनाचा अनुभव फडणवीसांच्या पाठीशी असणं त्यांच्या पथ्यावर पडू शकतं.

6/10

maharashtracm

अजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा कधी लपवून ठेवलेली नाही. अनेकदा त्यांनी जाहीर सभांमधून मुख्यमंत्रिपद न मिळाल्याची खदखद व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरींनी अजित पवार 25 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे.  

7/10

maharashtracm

उद्धव ठाकरे- विरोधात असलेल्या महाविकास आघाडीकडून राज्यातील सर्वोच्च पदासाठी कायमच चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे उद्धव ठाकरे. भाजपाबरोबर 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदावरुन फिस्कटल्यानंतर महाविकास आघाडीची मोट बांधत शरद पवारांच्या मध्यस्थितीने काँग्रेसबरोबर जुळवून घेत ठाकरे मुख्यमंत्री झाले. 

8/10

maharashtracm

नाना पटोले - काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेलं एकमेव नाव म्हणजे नाना पटोले! सध्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले या शर्यतीत असले तरी त्यांचे अनेकदा मित्रपक्षांशी खटके उडताना पहायला मिळालं आहे. त्यामुळे दिल्ली या नावाला किती सकारात्मक असेल हा प्रश्न कायम आहेच.

9/10

maharashtracm

सुप्रिया सुळे - या यादीमधील शेवटचं नाव आहे, खासदार सुप्रिया सुळे! राज्याच्या पहिला मुख्यमंत्री म्हणून अनेकदा सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा झाली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी 'झी 24 तास'च्या विशेष मुलाखतीमध्ये सुप्रियाला केंद्रीय राजकारणात रस असून तिला राज्यातील राजकारणात रस असल्याचं आपल्याला दिसलेलं नाही, असं त्यांचे वडील खासदार शरद पवार यांनी म्हटलं होतं.  

10/10

maharashtracm

जयंत पाटील - शरद पवारांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा या यादीत आहेत. शरद पवारांची यासंदर्भात अनेकदा सूचक विधानं करत नेतृत्व जयंत पाटील करतील असं म्हटलं आहे. मात्र निकालाच्या एक दिवस आधीच संजय राऊतांनी, 'जयंत पाटील राज्य चांगलं संभाळतील' असं विधान केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.