AC कितीही वापरला तरी वाढणार नाही बिल, फॉलो करा या टिप्स

एसीचं योग्य कूलिंग होण्यासाठी तापमान नेहमी ठराविक क्रमांकावर सेट करा. अनेकजण 18, 20 वर एसी वापरतात, ज्यामुळे बिल जास्त येतं. तुम्ही 25 वरही तापमान सेट करु शकता.   

May 08, 2024, 17:59 PM IST

एसीचं योग्य कूलिंग होण्यासाठी तापमान नेहमी ठराविक क्रमांकावर सेट करा. अनेकजण 18, 20 वर एसी वापरतात, ज्यामुळे बिल जास्त येतं. तुम्ही 25 वरही तापमान सेट करु शकता. 

1/9

प्रचंड उकाडा असल्याने सध्या AC चा वापर वाढला आहे. यादरम्यान अनेकजण एसी अपेक्षित गारवा देत नसल्याची तक्रार करताना दिसतात.   

2/9

पण काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला वीजेचा कमी वापर करत जास्त चांगली कूलिंग मिळू शकते.   

3/9

एसीचं योग्य कूलिंग होण्यासाठी तापमान नेहमी ठराविक क्रमांकावर सेट करा. अनेकजण 18, 20 वर एसी वापरतात, ज्यामुळे बिल जास्त येतं. तुम्ही 25 वरही तापमान सेट करु शकता.   

4/9

जर तुम्हाला चांगलं कूलिंग हवं असेल तर एसी असणाऱ्या रुममध्ये कमीत कमी फर्निचर असेल याची काळजी घ्या. जास्त सामान, फर्निचर असल्यास हवेत अडथळा येतो.   

5/9

एसी रुमला थंड करण्याचं काम करतो. पण जर खिडकी किंवा दरवाजातून ऊन आत येत असेल तर थंडऐवजी रुम गरम होईल.   

6/9

एसीमधून चांगलं कुलिंग हवं असल्यास तापमान कमी कऱण्याऐवजी तुम्ही खोलीतील पंखा सुरु करा. यामुळे एसीची हवा रुममध्ये फिरेल आणि लवकर थंड होईल.   

7/9

एसीचं कूलिंग लवकर करण्यासाठी तापमान 16 किंवा 18 ठेवू नका. असं केल्यास वीजबिल कमी होण्याऐवजी वाढत जाईल.   

8/9

एसीचं कुलिंग चांगलं होण्यासाठी त्याचं नियमितपणे सर्व्हिसिंग कऱणं गरजेचं आहे. सर्व्हिस न केल्यास कूलिंग खराब होतं.   

9/9

एसीमधून काही लीकेज होतंय का याकडे लक्ष द्या. असं झाल्यास एसी योग्य कूलिंग तर करणार नाहीच, उलट बिलातही वाढ होईल.