मुंबईतील 'ताज हॉटेल'मध्ये चहा प्यायला जायचंय? पण इथं कितीला मिळतो चहा? कोणते पदार्थ आहेत Menu मध्ये जाणून घ्या

Taj Mahal Palace Mumbai : वाह ताज! म्हणत समुद्रकिनाऱ्याच्या साक्षीनं अनुभवा काही अविस्मरणीय क्षण... प्रेमाच्या माणसासाठी सरप्राईज द्यायला हा उत्तम पर्याय   

Aug 09, 2023, 14:03 PM IST

Taj Mahal Palace Mumbai : काही ठिकाणं पाहताक्षणीच आपल्या मनाचा ठाव घेतात. त्या ठिकाणांना आपण आपल्या परीनं मनात साठवून ठेवतो. यातलंच एक ठिकाण म्हणजे मुंबईतील हॉटेल ताज महाल पॅलेस. 

1/9

Mumbai Hotels

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

Mumbai Hotels : मुंबईतील काही आलिशान हॉटेलच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या आणि देशातील पहिलं पंचतारांकित हॉटेल अशी ओळख असणाऱ्या ताज महाल पॅलेसची प्रत्येकाच्या मनात खास जागा. 

2/9

इथं एकदातरी जाऊ...

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

हे हॉटेल प्रत्यक्षात तिथं जाऊन अनुभवणाऱ्यांसोबतच बाहेरून या हॉटेलकडे कुतूहलानं पाहणाऱ्यांपर्यंत, त्याच्यासोबत सेल्फी आणि असंख्य फोटो काढणाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठीच ताज तितकंच खास. इथं एकदातरी जाऊ... असं म्हणत तुम्हीही एकदातरी त्या ठिकाणहून परतला असाल.   

3/9

ताजमध्ये बसून चहा

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

आता तुम्हाला ही कमालीची संधी मिळणार आहे. ताजमध्ये जाण्याचं स्वप्न तुम्हीही पाहिलंय तर तुम्हाला माहितीये का हॉटेलकडूनच यासाठीची एक संधी दिली जातेय. जिथं तुम्ही ताजमध्ये बसून चहा, तिथले काही खाद्यपदार्थ यांची चव चाखू शकता. 

4/9

आफ्टरनून टी लाऊंज

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

एक 100 वर्षांहून जुनी वास्तू जिथं बसून तुम्ही चक्क चहा पिण्याचा आनंद घेता हे सर्वकाही तुम्हाला ताजमध्ये अनुभवता येतं. आफ्टरनून टी लाऊंजमध्ये तुमच्यासमोर इंग्लिश टी स्नॅक्स बफे सर्व्ह केला जातो. इथं तुम्हाला चहाचे विविध पर्यायही मिळतात. (छाया सौजन्य- ट्रिपअॅडवाहयजर)  

5/9

सादर करण्याची शैली

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

भारतीय, कॉन्टीनेंटल आणि अगदी शेवपुरीसारखे पदार्थही ताजच्या या लाऊंजमध्ये सर्व्ह केले जातात.  बरं, ते सादर करण्याची शैली इतकी सुंदर की या पदार्थांकडे पाहवं की त्यांची चव चाखावी अशाच द्विधा मनस्थितीत आपण अडकतो. (छाया सौजन्य- ट्रिपअॅडवाहयजर)

6/9

पदार्थांची रेलचेल

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

झुकितीनी, सॅफ्रन रिसोटो, स्पगेटी, ग्रिल्ड अस्पॅरगस इथपासून भेलपुरी, शेवपुरी, खिमा घोटाला असे पदार्थ तुम्हाला इथं चाखता येतील.  (छाया सौजन्य- ट्रिपअॅडवाहयजर)

7/9

फक्त चहाच नव्हे तर...

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

फक्त चहाच नव्हे, तर इथं तुम्ही शँपेन किंवा तुमच्या आवडीच्या कॉकटेलचा घोट घेत समोर असणाऱ्या अथांग समुद्राच्या हालचाली, बोटींची ये-जा पाहू शकता. (छाया सौजन्य- ट्रिपअॅडवाहयजर)

8/9

सेमी फॉर्मल हा ड्रेसकोड

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

इथं येण्यासाठी सेमी फॉर्मल हा ड्रेसकोड असून, प्रती व्यक्तीमागं किमान खर्च येतो 1500 रुपये. दोन व्यक्तींसाठी इथं साधारण 5 हजार रुपये तुम्ही खर्च करता. www.tajhotels.com या संकेतस्थळावर तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळते.

9/9

हे सरप्राईज आयुष्यभर लक्षात राहील

how to book Sea Lounge for afteroon tea at the Taj Mahal Palace Mumbai

थोडक्यात काय, तर नेहमी बाहेरूनच फोटो काढण्यापेक्षा कधीतरी एखाद्या खास दिवशी, एखाद्या खास प्रसंगी, कोणावर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा खास गोष्टींच्या सेलिब्रेशनसाठी तुम्हीही ताजमध्ये नक्की जा... हे सरप्राईज आयुष्यभर लक्षात राहील यात शंकाच नाही.