महिना 10000 रुपये देणाऱ्या लाडका भाऊ योजनेसाठी कुठे, कसा कराल अर्ज? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?

How To Apply For Ladka Bhau Yojana Step By Step Guide: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातून लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी कशापद्धतीने अर्ज करता येईल? तो कुठून करावा? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील जाणून घेऊयात...

| Jul 17, 2024, 10:40 AM IST
1/8

How To Apply For Ladka Bhau Yojana

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर आता आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केली आहे. तीन वेगवेगळ्या गटांमध्ये निधीची वर्गवारी करण्यात आली आहे.   

2/8

How To Apply For Ladka Bhau Yojana

लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. मात्र यासाठी नेमकं काय लागणार आहे? कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत? हा अर्ज कसा आणि कुठे करता येईल हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात...

3/8

How To Apply For Ladka Bhau Yojana

अर्ज करण्याची पद्धत जाणून घेऊयात. हा अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर करता येईल.  

4/8

How To Apply For Ladka Bhau Yojana

नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करणं आवश्यक.  

5/8

How To Apply For Ladka Bhau Yojana

नवीन वापरकर्ता पर्याय निवडल्यावर फॉर्ममध्ये नाव, पत्ता आणि वयोगट अशी माहिती भरावी.  

6/8

How To Apply For Ladka Bhau Yojana

आवश्यक कागदपत्रं अपलोड करावीत.  

7/8

How To Apply For Ladka Bhau Yojana

नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.  

8/8

How To Apply For Ladka Bhau Yojana

लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेला कागदपत्रं कोणती?