Ashadhi Ekadashi 2024: 'विठ्ठल' शब्दाचा नेमका अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाही नाही

Ashadhi Ekadashi 2024 Meaning Of Word Lord Vitthal: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. दरवर्षी आवर्जून होणारी गर्दी आणि विठूरायाला एक झलक पाहण्यासाठी लाखो भाविक आषाढीनिमित्त पंढरपूरला येतात. मात्र ज्या विठ्ठलासाठी हे भाविक येतात त्या विठ्ठल शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? तोच जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jul 17, 2024, 08:10 AM IST
1/8

Meaning Of Word Lord Vitthal

आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांची गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेली आहे.   

2/8

Meaning Of Word Lord Vitthal

वारी, आषाढी एकादशी म्हटलं की आवर्जून तोंडी येणार शब्द म्हणजे विठ्ठल किंवा विठू माऊली!  

3/8

Meaning Of Word Lord Vitthal

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या या देवतेच्या विठ्ठल नावाचा नेमका अर्थ तुम्हाला माहितीये का? तुमच्यापैकी 99 टक्के लोकांना नक्कीच या शब्दाचा अर्थ ठाऊक नसणार.   

4/8

Meaning Of Word Lord Vitthal

विठ्ठल या नावाची स्पष्टीकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहिलेच्या सांगितले आहे, असं लेखक रा. चिं. ढेरे यांनी 'श्री विठ्ठल : एक महासमन्वय' या पुस्तकात म्हटलं आहे.  

5/8

Meaning Of Word Lord Vitthal

या पुस्तकामध्ये विठ्ठल नामाचा अर्थ सांगण्यात आला असून विठ्ठल या शब्दाची तीन भागांमध्ये फोड होते.  

6/8

Meaning Of Word Lord Vitthal

विदा (ज्ञानेन), ठान् (अज्ञजनान्) लाति (गृहृाति) अशी विठ्ठल शब्दाची फोड करता येईल.  

7/8

Meaning Of Word Lord Vitthal

फोड करुन विठ्ठल शब्दाचा अर्थ, "अज्ञ जनाना जो ज्ञानाने स्वीकरतो, तो विठ्ठल!" असा होतो.  

8/8

Meaning Of Word Lord Vitthal

तर अनेक अभ्यासकांनी विष्णू- विष्टु- विठ्ठल अशा प्रक्रियेने विष्णुपासून विठ्ठल हे नाम बनले असं स्वीकारलं आहे.