सिनेमातील रोमॅंटीक सीन कसा शूट होतो? सत्य समजलं तर डोक्याला हात लावाल

  किसिंग सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांना किती मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला माहिती आहे का?

| Mar 23, 2024, 22:07 PM IST

Kissing Scene Shooting:  किसिंग सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांना किती मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला माहिती आहे का?

1/8

सिनेमातला रोमॅंटीक सीन कसा शूट होतो? सत्य समजलं तर व्हाल हैराण

How Romantic Kissing Scene Shoot in Cinema Bollywood Marathi News

Kissing Scene Shooting: सिनेमात हिरो आणि हिरोईन रोमँटिक किंवा किसिंग सीन आपण पाहिले असतील. दोघांनी खरोखर एकमेकांना किस केलंय, असंच पाहणाऱ्याला वाटू शकतं. पण बऱ्याचदा असं नसतं.

2/8

सीन शूट करणं अधिक कठीण

How Romantic Kissing Scene Shoot in Cinema Bollywood Marathi News

अनेकदा हिरो-हिरोईन एकमेकांसोबत रोमॅंटीक सीन शूट करण्यासाठी कम्फर्टेबल नसतात. त्यामुळे असा सीन शूट करणं अधिक कठीण होतं. पण  किसिंग सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांना किती मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला माहिती आहे का?

3/8

आभास निर्माण केला जातो

How Romantic Kissing Scene Shoot in Cinema Bollywood Marathi News

अनेक प्रकारे बोल्ड किंवा रोमँटिक आणि किसिंग सीन शूट केला जातो. या पद्धतींपैकी एक म्हणजे ब्युटी शॉट्स. ब्यूटी शॉट म्हणजे असा शॉट ज्यामध्ये एखाद्या गोष्टीचे सौंदर्य किंवा आकर्षक पैलूंवर जोर दिला जातो. काहीही न बोलताही प्रेक्षकांना खूप काही घडले आहे असे वाटावे, अशाप्रकारे सिनेमॅटोग्राफीचे तंत्र वापरले जाते. 

4/8

पांघरूण टाकले जाते

How Romantic Kissing Scene Shoot in Cinema Bollywood Marathi News

ब्युटी शॉट्समध्ये एखाद्याला मिठी मारणे, कोणाचे चुंबन घेणे, हात पकडणे इ. यामध्ये कॅमेऱ्याचा अँगल महत्वाचे काम करतो.  दिग्दर्शकाला दाखवायचा असलेल्या भागाचा क्लोज-अप दिसेल असाच अॅंगल धरला जातो. रोमॅंटीक सीनमध्ये बेडवर सॅटिनच्या बेडशीटचा वापर केला जातो आणि त्यावर पांघरूण टाकून केवळ आभास निर्माण केला जातो.

5/8

क्रोमा टेक्नॉलॉजी

How Romantic Kissing Scene Shoot in Cinema Bollywood Marathi News

किसिंग सीन देखील क्रोमा शॉट्ससह शूट केले जातात. क्रोमा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सर्व दृश्य एकाच रंगाच्या स्क्रीनसमोर चित्रित केले जातात.

6/8

हिरव्या किंवा निळ्या लेन्सने शूट

How Romantic Kissing Scene Shoot in Cinema Bollywood Marathi News

रोमँटिक सीन शूट करण्यासाठी तो सीन हिरव्या किंवा निळ्या लेन्सने शूट केला जातो. जो नंतर एडिटिंगद्वारे गायब केला जातो. उदाहरणार्थ, जर एखाद्या अभिनेत्याला रोमँटिक सीन करणे सोयीचे नसेल तर तो सीन हिरव्या पडद्याने शूट केला जातो.

7/8

बॅकग्राऊंड बदलणे सोपे

How Romantic Kissing Scene Shoot in Cinema Bollywood Marathi News

हिरव्या रंगात इतर रंगांपेक्षा जास्त प्रकाश शोषण्याची क्षमता असते. यामुळे बॅकग्राऊंड बदलणे सोपे होते. समजा नायक-नायिका बाटलीचे चुंबन घेतात. 

8/8

फायनल एडीट

How Romantic Kissing Scene Shoot in Cinema Bollywood Marathi News

पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान दोन कलाकारांमधील बाटली काढून टाकली जाते आणि फायनल एडीटमध्ये हिरो आणि हिरोईनने खरोखर चुंबन घेतल्यासारखे दिसते.