कपाळावर टिळा अन्...भक्तीत लीन झाली कंगना रणौत; वाढदिवसानिमित्तानं घेतलं 'या' शक्तिपीठाचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आज 37 वाढदिवस आहे. इतरांप्रमाणे कंगनानं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंदिरात जाताना दिसली. त्याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्यांचीच चर्चा सुरु आहे. चला तर पाहूया कुठे गेली होती कंगना रणौत...

Diksha Patil | Mar 23, 2024, 18:45 PM IST
1/7

देवीचे दर्शन

कंगनानं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या कांगडा येथे पोहोचली. इथे असलेल्या प्राचीन मंदिर देवी श्री बगलामुखीचा आशीर्वाद घेतला. 

2/7

कुटुंबासोबत घेतलं दर्शन

दरम्यान, देवीचं दर्शन घेण्यासाठी कंगना एकटी नाही तर संपूर्ण कुटुंबासोबत गेली होती. तर तिनं स्वत: साठी महायज्ञ देखील केलं. 

3/7

बगलामुखीचं दर्शन घेतल्यानंतर 'या' शक्तिपीठाला दिली भेट

कंगनानं बगलामुखी यांचे दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंबासोबत ज्वाला जी यांचे देखील दर्शन घेतले. तर तिनं सांगितलं की प्राचिन शक्तिपीठमध्ये देवी सीताच्या जीभेचा भाग या ठिकाणी पडली होती.

4/7

धागा बांधून घेतला

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कंगनानं तिथे असलेल्या पुजारींकडून हातात धागा बांधून घेतला. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना फार आवडला.   

5/7

फिल्मी बॅकग्राऊंड नाही

कंगनाचं कोणतंही फिल्मी बॅकग्राऊंड नाही. तिचे वडील ही बिझनेसमॅन होते. त्यामुळे ती फार साधारण कुटुंबातून होती. 

6/7

लहानपणापासून होती अभिनयाची आवड

कंगनाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. तिनं फॅशन, बुलेट राणी, क्‍वीन आणि मणिकर्णिकासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 

7/7

वाढदिवसानिमित्तानं चाहत्यांकडून मिळाल्या भरपूर शुभेच्छा... (All Photo Credit : Kangana Ranut Instagram)