झोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा? जेणेकरून आरोग्यावर थोडासाही परिणाम होणार नाही

मोबाईल घेऊन झोपणे हा जवळपास प्रत्येकाच्या लाइफस्टाइलचा भाग बनला आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की झोपताना मोबाईल सोबत ठेवणे किंवा उशीखाली ठेवणे धोकादायक ठरू शकते. 

तेजश्री गायकवाड | Nov 17, 2024, 17:19 PM IST

मोबाईल घेऊन झोपणे हा जवळपास प्रत्येकाच्या लाइफस्टाइलचा भाग बनला आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की झोपताना मोबाईल सोबत ठेवणे किंवा उशीखाली ठेवणे धोकादायक ठरू शकते. 

1/8

मोबाईल हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा असा एक भाग बनला आहे की सर्वत्र तो आपल्यासोबतच असतो. मोबाईलची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, खाताना, पिताना, येताना, उठता-बसता आपली नजर सतत मोबाईलवरच असते. झोपेत असतानाही काही लोक मोबाईलला सोडू इच्छित नाहीत.  

2/8

याला खरतर मोबाईलचे व्यसन म्हणतात. जर तुम्हालाही असेच मोबाईलचे व्यसन लागले असेल तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. जे लोक झोपताना उशीखाली मोबाईल ठेवतात त्यांनी तर आताच सावध व्हा नाही तर  अशा सवयीचे अनेक मोठे तोटे आहेत.

3/8

आता असा प्रश्न निर्माण होतो की  झोपताना मोबाईल स्वतःपासून किती दूर ठेवावा? झोपताना मोबाईल जवळ ठेवला तर काय नुकसान होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नसते.

4/8

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने  देखील या संदर्भात इशारा दिला आहे. एका रिसर्चने आपल्या अहवालात म्हटले आहे की 68 टक्के प्रौढ आणि 90 टक्के किशोरवयीन मुले त्यांच्यासोबत मोबाईल फोन घेऊन झोपतात.  

5/8

झोपताना शरीरापासून मोबाईल किती दूर ठेवावा याबद्दल WHO ने मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत. ज्यानुसार मोबाईलच्या रेडिएशन तुमचे लैंगिक जीवन खराब करू शकते आणि कर्करोग देखील होऊ शकतो.   

6/8

या संदर्भात कोणतेही लेखी मानक किंवा माप नसले तरी मोबाईलमधून निघणारे रेडिएशन टाळण्यासाठी झोपताना ते स्वतःपासून दूर ठेवणे चांगले. बेडरूममध्ये मोबाईल ठेवल्यास उत्तम आहे असे सांगितले जाते. 

7/8

जर हे शक्य नसेल तर झोपताना तुमचा मोबाईल किमान 3 फूट दूर असावा. असे केल्याने, मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रो-मॅग्नेटिक रेडिएशनची ताकद लक्षणीयरीत्या कमी होते आणि तुम्हाला रेडिएशनचा धोका नाही. त्यामुळे फोन उशीखाली ठेवून कधीही झोपू नये.  

8/8

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)