AI Chat बॉट्स धोकादायक का म्हटलं जातं? असंख्य लोक नोकरी गमावणार

गेल्या काही महिन्यांपासून असे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल (Artifical Intelligence Tools)समोर आले आहेत, जे माणसांचं आयुष्य सहज सोपं करत आहेत. यांच्या सहाय्याने अनेक कामं तुम्ही काही मिनिटात पूर्ण करु शकता. पण यानंतरही या टूल्ससंबंधी चिंताही निर्माण होत आहे. याला तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणावं की भविष्यात निर्माण होणार संकट समजावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. अनेक तज्ज्ञ मनुष्यासाठी हा धोका असू शकतो असं सांगितलं आहे. हे धोके काय असू शकतात हे समजून घ्या.

Feb 11, 2023, 19:01 PM IST
1/5

आपल्या क्षमतांच्या आधारे हे टूल्स अनेक अशी कामं करु शकतात ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. यामुळेच हे एक संकट असू शकतं असं म्हटलं जात आहे.   

2/5

आगमी काळात AI टूल्समुळे कॉल सेंटरमधील अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. याचं कारण म्हणझे हे टूल्स अत्यंत योग्य पद्धतीने संवाद साधू शकतात. हा संवाद साधताना समोर माणूस आहे की चॅटबॉट हे तुम्हाला समजणारही नाही.   

3/5

ज्या नोकऱ्या धोक्यात येतील अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामध्ये कंटेंट रायटिंग, टायपिंग, कन्स्लटन्सी अशा अनेक गोष्टी आहेत. या नोकऱ्या पूर्ण किंवा काही प्रमाणात धोक्यात येऊ शकतात.   

4/5

विश्वास बसत नसला तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाले चॅटबॉट काही काळाने आपले खरे रंग दाखवू शकतात. यामुळे असंख्य लोकांना नोकरी गमवावी लागू शकते.   

5/5

कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले चॅटबॉट्स सर्वात धोकादायक आहेत कारण त्यांनी स्वतःचे विचार विकसित केले आहेत आणि त्यांना काहीही दाखवण्याची गरज नाही. उलट ते स्वत: नवीन गोष्टी शिकतात, समजून घेतात आणि वापरतात. हे माणसांसाठी खरोखर धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.