इथे डॉक्टरच नाही तर कॅन्सरग्रस्तांच्या वेदना कमी करतोय डॉ. घोडा

डॉक्टर घोड्याची कमाल! कॅन्सरग्रस्त रुग्णांनाच्या वेदना दूर करतो, थेट रुग्णालयात पोहोचतो

Mar 14, 2021, 16:03 PM IST
1/7

आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकलंय की, एखादे डॉक्टर किवा तज्ज्ञ एखाद्या रूग्णांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतात पण कधी आपण असं ऐकलय का? एखादा प्राणी मानवाच्या शारीरिक आणि मानसिक वेदना कमी करतो, त्याचे दु:ख कमी कमी करण्याचा प्रयत्न करतो. ऐकून विश्वास बसणार नाही पण मांजर किंवा कुत्रा नाही तर चक्क एक घोडा या रुग्णांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो. फोटो सौजन्य- Demforever

2/7

फ्रान्समध्ये एक घोडा आजारी व्यक्तीच्या वेदना कमी करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे हा घोडा कॅन्सरने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या वेदना कमी करण्यास मदत करतो.  कॅन्सर ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी तो रोज रुग्णालयात येतो. त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांच्या वेदना दूर केल्या आहेत म्हणून त्याला डॉ. पेयो या नावानं ओळखलं जातं. फोटो सौजन्य- Demforever

3/7

डॉ. पेयोमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे अशी की कोणत्या रूग्णाला कॅन्सर आहे आणि कोणाला ट्यूमर हे त्याला आपोआप समजते. याशिवाय त्याला कोणत्या रूग्णांजवळ किती वेळ थांबायचं हे तो स्वत: ठरवतो. फोटो सौजन्य- Demforever

4/7

डॉ. पेयोचे मालक हसन बुचकोर आहेत यांनी रूग्णांच्या सेवेसाठी त्याला प्रशिक्षण दिले. पहिले घोड्याचे नाव पेयो ठेवले होते पण रूग्णांच्या वेदना कमी केल्या आणि  रूग्णांनी बर वाटू लागले तेव्हा त्याला डॉ. पेयो म्हणून संबोधले जाऊ लागले. फोटो सौजन्य- Demforever

5/7

 त्यानंतर तो डॉ. पेयो या नावाने प्रसिद्ध झाला. आता तो १५ वर्षाचा आहे. हसन सांगत होते की, आम्ही दोघे जास्तीत जास्त वेळ रूग्णासोबत  हॉस्पिटलमध्ये घालवतो. फोटो सौजन्य- Demforever

6/7

डॉ. पेयो अगोदरपासून रूग्णांना भेटत आहेत.  मारिन मॅटास्टॅटिक ही कॅन्सर पीडित होती. जेव्हा त्याचा मुलगा त्यांना भेटायला गेला तेव्हा तो पेयोला सोबत घेऊन गेला. फोटो सौजन्य- Demforever

7/7

त्याअगोदर त्यांना खूप वेदनेमुळे त्रात होत होता पण डॉ. पेयोला पाहताच त्याच्या सर्व वेदना कमी झाल्या. डॉ. पेयो आणि रूग्णांमधील मैत्रीच्या अनेक कथा आहेत. फोटो सौजन्य- Demforever