जुलैत तब्बल महिन्यात 12 दिवस बंद असणार बॅंका!

जुलै महिना सुरुच होणार आहे. भारतीय रिजर्व बॅंकनं जुलै महिन्याच्या बॅंकच्या सुट्यांची यादी जाहिर केली आहे.  या लिस्टनुसार, जुलैमध्ये जवळपास 12 दिवस बॅंक बंद असणार आहे. जुलै महिन्यात गुरु हरगोविंद जी जयंती आणि मोहरमच्या निमित्तानं बॅंक बंद असणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी बॅंकेची सुट्टी असेल. जुलैमध्ये बॅंक हॉलिडे जवळ-जवळ प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी असते. अशात बॅंकेत जाण्याआधी एकदा बॅंक हॉलिडेच्या निमित्तानं तपासायला हवं, कारण यामुळे तुमचा वेळ वाचेल. 

| Jun 21, 2024, 18:11 PM IST
1/7

3 जुलै 2024: बेह दीनखलामच्या निमित्तानं 3 जुलै रोजी 2024 रोजी शिलॉंगच्या बॅंक बंद राहतील. 

2/7

6 जुलै 2024: MHIP Day निमित्तानं या दिवशी अजवालमध्ये सुट्टी आहे. 

3/7

8 जुलै 2024: 8 जुलैला इंफालच्या बॅंक बंद राहतली. या दिवशी कांग-रथयात्रेच्या निमित्तानं बॅंक बंद राहणार आहेत. 

4/7

9 जुलै 2024: द्रुक्पा त्से-जी (Drukpa Tshe-zi) च्या निमित्तानं गंगटोकच्या बॅंक बंद आहेत.  

5/7

16 जुलै 2024: हरेला (Harela) च्या निमित्तानं देहरादूनमधील बॅंक बंद असतील. 

6/7

17 जुलै 2024: मोहरमच्या निमित्तानं देशातील अनेक राज्यांमधील बॅंकांना सुट्टी असेल. या दिवशी फक्त पणजी, तिरुवनंतपुरम, कोची, कोहिमा, इटानगर, इम्फाल, देहरादून, गॅन्गटोक, गुवाहाटी, चंडिगढड, भुवनेश्वर, अहमदाबादमध्ये बॅंक या सुरु असतील. 

7/7

7 जुलै, 14 जुलै , 21 जुलै आणि 28 जुलै रोजी रविवार असल्यानं देशातील सगळ्यात बॅंक बंद असतील. तर 13 जुलै दुसरा शनिवार आणि 27 जुलै रोजी चौथा शनिवार असल्यानं बॅंक बंद राहतील.