बिग बी, किंग खान आणि सलमानलाही टाकलं मागे; 'हा' अभिनेता भरतो कोट्यवधींचा टॅक्स

31 जुलैपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. देशातील करोडो करदाते सध्या याच प्रक्रियेत गुंतले आहेत. बॉलिवूड कलाकार दरवर्षी किती आयकर भरतात हे तुम्हाला माहित्येत का? जाणून तर जाणून घ्या. 

Jul 07, 2023, 15:35 PM IST

Highest Taxpayer Of Actor Of Bollywood: 31 जुलैपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. देशातील करोडो करदाते सध्या याच प्रक्रियेत गुंतले आहेत. बॉलिवूड कलाकार दरवर्षी किती आयकर भरतात हे तुम्हाला माहित्येत का? जाणून तर जाणून घ्या. 

1/7

बिग बी, किंग खान आणि सलमानलाही टाकलं मागे; 'हा' अभिनेता भरतो कोट्यवधींचा टॅक्स

highest taxpayer of actor of bollywood akshay kumar on top

बॉलिवूड अभिनेता दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरतात. यात शाहरुख खान, सलमान खान अमिताभ बच्चन यांसारख्या सुपरस्टारचा समावेश आहे. मात्र, कमाई आणि टॅक्सच्या बाबतीत एका कलाकाराने या तिघांनाही मागे टाकले आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया. 

2/7

बीग बी

highest taxpayer of actor of bollywood akshay kumar on top

बॉलिवूडमधील सर्वाधिक टॅक्स पेयर कलाकारांच्या यादीत बीग बी अमिताभ बच्चन यांचे नाव सामील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2018-19मध्ये अमिताभ बच्चनने 70 कोटींचा कर भरला होता. अमिताभ बच्चनची एकूण संपत्ती 3396 कोटी रुपये आहे. 

3/7

किंग खान

highest taxpayer of actor of bollywood akshay kumar on top

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान 5910 कोटी रुपयांच्या संपत्तीला मालक आहे. मात्र कर भरण्याच्या बाबतीत तो थोडा मागे आहे. 2022मध्ये त्यांने जवळपास 22 कोटी रुपयांचा कर भरला होता.   

4/7

सलमान खान

highest taxpayer of actor of bollywood akshay kumar on top

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील प्रत्येक वर्षी करोडो रुपयांचा कर भरतात. अलीकडेच सलमान खानने आर्थिक वर्षात 44 कोटी रुपयांचा कर भरला होता. 

5/7

ऋतिक रोशन

highest taxpayer of actor of bollywood akshay kumar on top

ऋतिक रोशनदेखील कर भरण्याच्याबाबतीत मागे नाहीये. एकदा अभिनेत्याने अँडव्हान्स टॅक्सम्हणून 80 कोटी रुपये भरले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो 25.5 कोटी कर भरतोय. 

6/7

अक्षय कुमार

highest taxpayer of actor of bollywood akshay kumar on top

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या कलाकारांचे नाव अक्षय कुमार आहे. त्याने 2022मध्ये एकूण 29.6 कोटी रुपयांचा कर भरला होता. यावर्षात सर्वाधिक कर भरणाऱ्या कलाकारांच्या यादीत अक्षय अव्वल आहे. 

7/7

सन्मान पत्र

highest taxpayer of actor of bollywood akshay kumar on top

सर्वाधिक कर भरणाऱ्या अक्षयला आयकर विभागाने सन्मान पत्र देऊन सन्मानित केले आहे. अक्षय कुमारची नेटवर्थ जवळपास 2000 कोटी इतकी आहे. तो प्रत्येक वर्षी 486 रुपये कमावतो.