Health Tips : पावसाळ्याच्या दिवसांत 'हे' पदार्थ खाणं टाळावं!

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळ्यात अनेक आजारांना जणू निमंत्रणच मिळतं. अशावेळी खाण्यापिण्याबाबत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात कोणत्या पदार्थांचं सेवन करणं टाळालं

Jul 07, 2023, 14:06 PM IST
1/5

तळलेले पदार्थ- जास्त आर्द्रता असलेल्या हवामानात पचनसंस्था मंद होते. त्यामुळे अशावेळी पावसाळ्यात तेलकट पदार्थ खाऊ नयेत.

2/5

पालेभाज्या- पावसाळ्या दिवसात पालेभाज्या खाणं टाळल्या पाहिजेत. यात जंतू आणि घाण असल्याची शक्यता असते.   

3/5

कापलेली फळं- आरोग्यासाठी उत्तम म्हणून अनेकजण रस्त्याच्या बाजूला मिळणारी फळं खाण्याचा विचार करतात. मात्र यावेळी कापून ठेवलेली फळं खाऊन नये. पावसाळ्याच्या दिवसांत जंतू त्यांच्यावर चिकटून असण्याची शक्यता असते.

4/5

सोडायुक्त पेयं- ही पेयं शरीरातील मिनरल्स कमी करतात. त्यामुळे हे पेयं पिणं टाळावं

5/5

मासे- पावसाळ्यात मासे खाणं टाळावं. नॉन व्हेज खायची इच्छा झाल्यास चिकन खाऊ शकता.