Right Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर!

Right Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर! तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. चुकीच्या स्थितीत झोपल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रात्री कोणत्या कुशीवर झोपावे आणि का याची कारणे जाणून घेऊया. 

| May 08, 2024, 11:22 AM IST
1/7

डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर!

health tips in marathi What is the best sleeping position Left Or Right Side

उत्तम आरोग्यासाठी आठ तासांची झोप गरजेचे असते. झोप पुरेशी व नीट झाली असेल तर संपूर्ण दिवसभराची उर्जा मिळते. मात्र, झोपेचे गणित बिघडले तर संपूर्ण दिवस बिघडतो. तसंच, तुम्ही कसे झोपता यावरही आरोग्याचे गणित अवलंबून आहे. 

2/7

आरोग्यतज्ज्ञ

health tips in marathi What is the best sleeping position Left Or Right Side

 खरंतर कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती मानली जाते. मात्र, कोणत्या उजव्या की डाव्या कोणत्या कुशीवर झोपावे याविषयी आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात, ते जाणून घ्या.

3/7

आयुर्वेदातही नोंद

health tips in marathi What is the best sleeping position Left Or Right Side

तज्ज्ञांच्या मते, डाव्या कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम बाजू मानली जाते. आयुर्वेदातही याबाबत नोंद आहे. 

4/7

रक्तप्रवाह सुरळीत

health tips in marathi What is the best sleeping position Left Or Right Side

डाव्या कुशीवर झोपल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते. छातीत जळजळ होणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसंच, रक्तप्रवाह सुरळीत होऊन हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो. 

5/7

घोरण्याची सवय

health tips in marathi What is the best sleeping position Left Or Right Side

डाव्या कुशीवर झोपल्याने उजवी नाकपुडी उघडते. त्यामुळं उर्जा आणि पचनशक्ती वाढते. त्याचबरोबर तुम्हाला घोरण्याची सवय असेल तर डाव्या कुशीवर झोपल्यास घोरणेदेखील बंद होते. 

6/7

गरोदर महिला

health tips in marathi What is the best sleeping position Left Or Right Side

गरोदर महिलांनाही डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला होता. कारण या स्थितीत झोपल्यामुळं पोटावरील दाब कमी होतो व गर्भातील बाळ सुरक्षित राहते.

7/7

ऑक्सिजनचा पुरवठा

health tips in marathi What is the best sleeping position Left Or Right Side

डाव्या कुशीवर झोपल्याने  शरीरातील सर्व अवयवांना रक्तप्रवाह व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)