दशक होत आला तरी एक हिट नाही, तरीही कंगना म्हणते- 'अमिताभ बच्चननंतर मीच!'

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या चित्रपटांमध्ये नाही तर निवडणूकीच्या प्रचारासाठी चर्चेत आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून भारतीय जनता पार्टीचे लोकसभा तिकिट मिळालं आहे. तर या प्रचारांमध्ये कंगना रणौतनं मोठं विधानं केली आहे. त्यापैकी एक म्हणजे कंगनानं स्वत: ची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. 

Diksha Patil | May 06, 2024, 17:20 PM IST
1/7

कंगना रणौत

कंगना रणौतनं गेल्या 9 वर्षात एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. तिचा सगळ्यात शेवटचा हिट चित्रपट हा तन्नू वेड्स मनु होता.   

2/7

कंगनाचा व्हिडीओ व्हायरल

कंगनाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्याला केआरकेनं शेअर केला आहे. 

3/7

अमिताभ यांच्याशी तुलना

कंगनाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात कंगना बोलताना दिसते की "सगळ्या देशाला आश्चर्य आहे की ती कंगना... मग राजस्थानला जाओ, पश्चिम बंगाल जाओ, दिल्ली आजो किंवा मग मणिपुर जाओ... असं वाटतं की इतकं प्रेम आणि इतका आदार... मी दावा करु शकते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर आज इंडस्ट्रीमध्ये प्रेम आणि आदर कोणाला मिळत असेल तर तो मला मिळत असेल." 

4/7

केआरकेची मजेशीर कमेंट

कंगना रणौतचा हा व्हिडीओ शेअर करत केआरकेनं कॅप्शन दिलं की 'बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन साहेबांनंतर कोणाला आदर मिळत असेल तर फक्त कंगना दीदीला, खरंच? हे कधी झालं...'  

5/7

फ्लॉप चित्रपट

कंगना रणौतचे गेल्या अनेक दिवसांपासून एकामागे एक असे फ्लॉप चित्रपट येत होते. त्यामुळे तिनं राजकारणात पदार्पण करण्याचा निर्णय घेत्याची चर्चा.

6/7

कंगनानं राजकारणाच्या पदार्पण

काही दिवसांपूर्वी कंगनानं यावर स्पष्टीकरण देत सांगितलं होतं की 'फ्लॉप चित्रपट हे कारण मुळीच नाही.'   

7/7

अखेरचा चित्रपट

कंगना विषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात शेवटी 'तेजस' या चित्रपटात दिसली होती. सुरुवातीला या चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. तर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तर जून महिन्यात तिचा 'एमरजन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.