एक चमचा मधात चिमूटभर काळीमिरी मिसळून खा, शरीरात होतील आश्चर्यकारक बदल

काळी मिरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्याचे कामही काळी मिरी करते. पण या व्यतिरिक्त आरोग्यासाठी काळीमिरीचे फायदे अधिक आहेत. 

| Nov 14, 2024, 13:19 PM IST

Health Tips In Marathi: काळी मिरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्याचे कामही काळी मिरी करते. पण या व्यतिरिक्त आरोग्यासाठी काळीमिरीचे फायदे अधिक आहेत. 

1/8

एक चमचा मधात चिमूटभर काळीमिरी मिसळून खा, शरीरात होतील आश्चर्यकारक बदल

Health tips in marathi Eating A Pinch Black Pepper Mixed In A Spoonful Honey is Miraculous For The Body

काळी मीरीचे सेवन एक चमचा मधासोबत केल्यास आरोग्यासाठी अनेक लाभदायक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर मधाचे लाभदेखील शरीराला मिळतात. अनेक रोगांपासून सुटका मिळते. 

2/8

काळी मिरी आणि मधाचे सेवन करण्यासाठी एक चमचा मध घेऊन त्यात चिमुटभर काळी मिरी पावडर मिसळुन घ्या. दिवसातून दोनदा तुम्ही याचे सेवन करु शकता. 

3/8

काळी मिरीत अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण आढळतात. जे घशातील खवखव आणि खोकल्यापासून आराम देते. मध हे खोकल्यावर नैसर्गिक औषध आहे. ज्यामुळं गळ्याची सूज कमी होते. 

4/8

काळी मिरी गॅस्ट्रिक ज्यूसचा स्त्राव वाढून पाचनसंस्था सुधारते. हे पोटातील गॅस, अॅसिडीटी आणि अपचन यापासून आराम देते. मध पाचनसंस्था शांत ठेवते आणि पाचनप्रक्रिया सुधारते. त्यामुळं दोघांच्या एकत्रित सेवनाने पोटाच्या समस्यांवर लाभदायक ठरते  

5/8

काळी मिरीत व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सीडेंट्स रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. मधातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण शरीराला व्हायरलपासून बचाव करतात. 

6/8

 काळी मिरी शरीरात साचलेली चरबी घटवण्याचे काम करतात आणि मेटाबॉलिज्म वाढवते. मधाचे सेवन फॅट बर्निंग प्रक्रियेसाठी फार उपयुक्त ठरते. काळी मिरी आणि मधाचे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 

7/8

काळीमीरीचे सेवन शरीरातील विषारी घटक बाहेर फेकून देण्यास फायदेशीर ठरते. ज्यामुळं त्वचा साफ आणि चमकदार राहते. तसंच, मधातील अँटी ऑक्सीडेंट गुण त्वचावरील सुरकुत्या कमी करतात व त्वचेला मुलायम ठेवतात. 

8/8

काय काळजी घ्याल

काळी मिरी आणि मधाचे सेवन उपयुक्त आहे मात्र प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास पोटात जळजळ होऊ शकते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)