अर्जुन तेंडुलकर 'मुंबई' सोडणार? 2022 मध्ये 'गुजरात'ने दाखवलेला इन्ट्रेस्ट; अखेर MI ने मोजलेली 'इतकी' रक्कम

इंडियन प्रीमिअर लीग या जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनचं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या अनेक जुन्या आणि नव्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला रिलीज केलं आहे. त्यामुळे मुंबईचा मेंटॉर असलेल्या सचिनचा मुलगा अर्जुन याला आपल्या संघात घेण्यासाठी कोणता संघ इन्ट्रेस्ट दाखवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.   

| Nov 14, 2024, 13:13 PM IST
1/6

अर्जुन तेंडुलकर हा एक ऑलराउंडर खेळाडू असून त्याने 2022 आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये स्वतःला रजिस्टर केलं होतं. यापूर्वी काही वर्ष तो मुंबई इंडियन्ससाठी नेटमध्ये बॉलिंग करत होता. 

2/6

आयपीएल 2022 मिनी ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरने प्रथमच स्वतःला रजिस्टर केलं होतं. त्याने 20 लाखांच्या बेस प्राईजवर स्वतःला रजिस्टर केलं होतं.  ऑलराउंडरच्या कॅटेगरीमध्ये अर्जुन ऑक्शन टेबलवर आला तेव्हा त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करण्यासाठी पहिली बोली लावली. त्याचवेळी गुजरात टायटन्सने देखील अर्जुनला आपल्या संघात घेण्यासाठी इन्ट्रेस्ट दाखवला. 

3/6

गुजरात टायटन्सने 5 लाख वाढवले आणि 25 लाखांची बोली अर्जुनवर लावली. तेव्हा पुन्हा मुंबई इंडियन्सने 30 लाखांची बोली लावून अर्जुनला आपल्या संघात घेतलं. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला मिनी ऑक्शनमध्ये तब्बल 10 लाखांचा अतिरिक्त फायदा झाला होता. 

4/6

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. 2023 मध्ये अर्जुनचे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले. तर अर्जुनने शेवटचा सामना हा आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळला. अर्जुनने आतापर्यंत एकूण 3 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करताना 13 धावा केल्या.   

5/6

आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांचे 6 खेळाडू रिटेन करण्याची मुभा होती. मात्र मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या 5 खेळाडूंना रिटेन केले. 

6/6

अर्जुन तेंडुलकरने आयपीएल 2025 मध्ये स्वतःला 30 लाखांच्या बेस प्राईजवर रजिस्टर केलं आहे. अर्जुनने बुधवारी झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात गोवा कडून खेळताना 5 विकेट्स घेतले. ऑक्शनपूर्वी अर्जुनने दाखवलेला हा परफॉर्मन्स पाहून त्याच्यावर मुंबई इंडियन्स वगळता इतर फ्रेंचायझी सुद्धा मोठी बोली लावू शकतात. तेव्हा वडील सचिन तेंडुलकर हे मुंबई इंडियन्सचे मेंटॉर असताना अर्जुन तेंडुलकर हा आयपीएल 2025 मध्ये कोणत्या संघाकडून खेळताना दिसणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.