दूध पांढरेच का असते? जाणून घ्या...

लहानपणापासूनच आपल्याला आपले पालक दूध प्यायला देत असतात. कोणाला सकाळी उठल्यावर दूध लागते तर कोणाला रात्री झोपण्यापूर्वी. त्यामुळे एकंदरीत प्रत्येकाच्या घरात दूध वापरलं जातं. पण आतापर्यंत दुधाचा एवढा वापर करूनही त्याचा रंग पांढरा का असतो याचा कधी विचार केला आहे का?

Apr 28, 2023, 19:49 PM IST
1/7

milk colour

कॅसिइन प्रोटीनमुळे आपल्याकडे येणाऱ्या दुधाचा रंग हा पाढरा असतो. हे प्रथिने दुधात असलेले कॅल्शियम आणि फॉस्फेट यांच्या संयोगाने Micelle नावाचे छोटे कण तयार करते. याशिवाय दुधात फॅट असल्याने दूध पांढरे असते.

2/7

milk Micelle

Fonterra’s Principal Research Scientist, Sheelagh Hewitt यांच्या मते, दुधात पाण्याचे प्रमाण जास्त असते. यासोबतच दुधात प्रथिने, चरबी आणि जीवनसत्त्वे देखील असतात. जेव्हा Micelleवर प्रकाश पडतो तेव्हा त्याचे अपवर्तन होते आणि ते विखुरते. त्यामुळेच दूध पांढरे दिसते.

3/7

milk fat

पण इतर दुभत्या जनावरांपेक्षा गाईचे दूध थोडे पिवळे दिसते. गाईचे दूध पातळ असते आणि त्यात फॅट आणि कॅसिइनचे प्रमाणही कमी असते यामुळेच गाईचे दूध फिकट पिवळे दिसते.

4/7

milk benefits

दुधामध्ये 5 टक्के लैक्टोज, 3.7 टक्के फॅट आणि 3.5 टक्के कॅसिन आणि कॅल्शियम कॉम्प्लेक्सअसते. म्हणून दुधाचे सेवन केल्यानंतर रोगांचा सामना करण्याची क्षमता वाढवते. कार्डिफ युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर पीटर एलवुड यांच्या नेतृत्वात केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, दूध प्यायल्याने हृदयरोग आणि स्ट्रोक सारख्या आजारांमुळे मृत्यूची शक्यता 15 ते 20 टक्क्यांनी कमी होते.

5/7

raw milk

तसेच उळकलेल्या दुधापेक्षा कच्च्या दुधाचे अधिक फायदे असून त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. लॅक्टोज, अस्थमा, ऍलर्जी, दमा, ऑटोइम्यून असलेल्या लोकांसाठी कच्चे दूध खूप फायदेशीर असते. मात्र दूध हे नेहमी उकळल्यानंतरचं पिणे चांगले असते.

6/7

Milk is hard to digest

दूध हे पचायला जड असतं त्यामुळे ज्यांची पचन क्षमता कमजोर असते अशांनी रात्री दूध पिणे टाळावे. एका दुधाच्या ग्लासात 120 इतक्या कॅलरीज असतात. त्यामुळे रात्री आपली पचनक्रिया मंद होत असल्याने त्याला पचायला भरपूर वेळ लागू शकतो.  

7/7

cow milk

दुसरं म्हणजे गाय आणि म्हशीच्या दुधाऐवजी बकरीचे दूध अधिक फायदेशीर असते. बकरीच्या दुधात अनेक पौष्टिक गुण असतात ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. तसेच बकरीच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. याचे सेवन केल्याने हाडे तसेच दात मजबूत होतात. (फोटो - Reuters)