Brain Stroke Signs : फक्त डोकेदुखीच नाही तर 'ही' आहेत ब्रेनस्ट्रोक होण्याची लक्षणं

जर तुम्हाला तंबाखू आणि दारुचं व्यसन असेल तर ब्रेन स्ट्रोक होण्याची दाट शक्यता असते. 

Jul 05, 2024, 19:22 PM IST

शरीराची जडण घडण ही हृदय, किडनी आणि मेंदूवर जास्त असते. निरोगी आरोग्यासाठी मेंदू सुदृढ असणं महत्त्वाचं आहे. 

 

1/9

बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना मानसिक ताण तणाव जास्त जाणवतो. याचा गंभीर परिणाम होऊन मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. यालाच ब्रेन स्ट्रोक असं म्हणतात.  

2/9

मेंदूचं आरोग्य अत्यंत नाजूक असतं. मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत न झाल्यास मेंदूच्या कार्यात अडथळा येतो. त्यामुळे रक्तवाहीनी मेंदूमध्ये फुटण्याचा धोका वाढतो आणि रुग्णाचा जीव जातो.   

3/9

वैद्यकीय अहवालानुसार, जर उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असल्यास ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते. 

4/9

याशिवाय  जर तुम्हाला तंबाखू आणि दारुचं व्यसन असेल तर ब्रेन स्ट्रोक होण्याची दाट शक्यता असते.   

5/9

चेहऱ्यावर सूज येणे

चेहऱ्यावर सतत सूज येत असल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका संभवतो.  

6/9

डोकेदुखी

सतत डोकं दुखणं हे मेंदू आजारी असल्याचा संकेत आहे. चक्कर येणं, अशक्तपणा जाणवणं ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आहेत.  

7/9

नजर दोष

जर अंधूक दिसण्याचा त्रास सतत जाणवत असेल तर हे ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. 

8/9

हात सुन्न पडणं

हाताला मुंग्या येणं, हाताला कोणताही जीव नसल्यासारखं वाटणं ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणं म्हटली जातात.   

9/9

बोलताना अडखळणं

ब्रेन स्ट्रोक होण्याआधी रुग्णांना बोलताना त्रास होतो.  बोलताना सतत अडखळणं ही समस्या वारंवार जाणवायला लागली तर ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आहेत, हे समजावं.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)