महाराष्ट्रात आहे जगातील सर्वात मजबूत किल्ला; इंग्रजांनी तोफेने उडवण्याचा प्लान बनवला होता पण...

Harihar Fort Trekking Tips: ट्रेकिंगची आवड असणारे तरुण तरुणी आवर्जून या किल्ल्याला भेट देतात.  इथल्या पायऱ्या चढण्याचा थरार अनुभवतात. 

| Jul 05, 2024, 23:32 PM IST

Mansoon Trekking Tips in Marathi: जगातील सर्वात मजबूत किल्ला महाराष्ट्रात आहे. शेकडो किल्ले इतिहासाचा साक्षीदार आहेत. नाशिक येथे असलेला हरिहर हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला आहे. लोक जीव धोक्यात घालून येथे ट्रेकिंग करतात. पहिल्या पावसानंतर अनेक हौशी तरूण तरूणी नाशिकच्या हरिहर गडावर जातात. 

1/7

नाशिक जिल्ह्यातील हरिहर गड  किल्ला जगातील सर्वात मजबूत किल्ला आहे.  हा सर्वात धोकादायक किल्ला म्हणूनही ओळखला जातो.  ट्रेकिंग साठी हा खूपच अवघड आहे. 

2/7

 हा किल्ला पर्वताच्या पायथ्यापासून चौरस दिसतो, परंतु त्याची रचना प्रिझमसारखी आहे. याची रचना दोन्ही बाजूंनी 90 अंश असून किल्ल्याची तिसरी बाजू 75 अंश आहे. हा किल्ला डोंगरावर 170 मीटर उंचीवर असून एक मीटर रूंद सुमारे 117 पायऱ्याद्वारे आपण या किल्लावर जावू शकतो.   

3/7

गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्वाचा होता. हा किल्ला 17 भक्कम किल्ल्यांपैकी एक होता.  

4/7

पश्चिम घाटाच्या त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर हरिहर किल्ला आहे. किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाला म्हणजेच 9 व्या 14 व्या शतकात झाला.   

5/7

हा किल्ला घोटी आणि नाशिक शहर पासून 40 कि.मी. अंतरावर आहे. तर इगतपुरीपासून 48 कि.मी. अंतरावर आहे.  या किल्लाला हरिहर किल्ला किंवा हर्षगड असे म्हंटले जातो. 

6/7

या किल्ल्यावर प्रत्येक जण चढाई करू शकत नाही. कारण बर्या च ठिकाणी 90 अंशांपर्यंत चढाई करावी लागते. या किल्ल्याच्या पायऱ्या चढणं अतिशय कठीण आहेत. हेच थ्रील अनुभवण्यासाठी तरूणाई हरिहर गडावर येतात.  

7/7

राज्यात ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहर गड, ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हा किल्ला जमिनीवर नाही तर एका सुंदर डोंगराच्या माथ्यावर आहे.  इंग्रजांनी तोफेने हा किल्ल उडवण्याचा प्लान बनवला होता.