एका दिवसांत किती ग्लास ज्यूस पिणं योग्य? जास्त ज्यूस पिणं धोकादायक?

सध्या उकाडा इतका वाढला आहे की, उन्हामध्ये थंडगार ज्यूसची मागणी वाढली आहे. दरम्यान सध्याच्या जमान्यात फळं खाण्यापेक्षा त्यांच्या ज्यूसला जास्त पसंती दिली जाते. काहीजण तर दिवसाला दोन ते तीन दिन वेळा ज्यूस पितात. पण जास्त प्रमाणात ज्यूस पिणं हेदेखील आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. जाणून घ्या यामागील कारणं काय आहेत.   

Apr 21, 2023, 11:13 AM IST
1/8

फळांमध्ये पौष्टिक तत्वं

फळांमध्ये पौष्टिक तत्वं असतात. फळांमध्ये अनेक प्रकारेच विटामिन्स, मिनरल्स, कार्बोहाइड्रेट, एंटीऑक्सीडेंट्स अशी तत्तवं असतात. फळांमध्ये हेल्दी फॅटही असतं जे आपल्या ह्रदयाला निरोगी ठेवतं. पण आजकाल फळांच्या जागी त्यांच्या ज्यूसला जास्त पसंती दिली जाते.   

2/8

उन्हाळ्यात ज्सूसचं जास्त सेवन करणं धोकादायक

How Much Juice is Safe

ज्यूसदेखील चांगले असतात पण त्यातून फायबर आणि माइक्रोन्यूट्रेंट्स निघून जातात. याशिवाय फळात Fructose Mature असतात. हा साखरेचा प्रकार आहे. त्यामुळे ज्यूसचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने डायबेटिजची समस्या उद्बवू शकते. तसंच उन्हाळ्यात ज्सूसचं जास्त सेवन करणं धोकादायक असू शकतं.   

3/8

ज्यूस शरिरातील अनेक गोष्टींवर प्रभाव करु शकतो

How Much Juice is Safe

ज्यूसमध्ये जास्त कॅलरी असते. एका कप ज्यूसमध्ये जवळपास 117 कॅलरी असते. याशिवाय त्यात 21 ग्रॅम सारखही असते. तसंच Fructose चं प्रमाण कमी असतं. यामुळे ज्यूस शरिरातील अनेक गोष्टींवर प्रभाव करु शकतो.   

4/8

डायबेटिजचे रुग्ण असाल तर सावधान

How Much Juice is Safe

ज्यूसमध्ये फ्रूट शुगरचं प्रमाण जास्त असतं. यामुळे जास्त सेवन केल्यास शुगरमध्ये वाढ होते. जर तुम्ही डायबेटिजचे रुग्ण असाल तर समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.   

5/8

जास्त सेवन करणं धोकादायक

How Much Juice is Safe

तसंच फ्रूट ज्यूसचं जास्त सेवन केल्याने दातांमध्ये किडे पडू शकतात आणि हे यकृताला योग्य प्रमाणात हायड्रेट ठेवू शकणार नाही. यामुळे जठरासंबंधी समस्या असणाऱ्याने हे नुकसान पोहोचवू शकतं.   

6/8

एका दिवसात एकच ग्लास ज्यूस प्या

How Much Juice is Safe

एका व्यक्तीने दिवसात एकच ग्लास ज्यूसचं सेवन केलं पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात. त्यापेक्षा जास्त ज्यूसचं सेवन करणं नुकसानकारक असू शकतं. याचा प्रभाव लगेच दिसत नसला, तरी नंतर मात्र शरिरावर त्याचे अनेक परिणाम होतात.   

7/8

सकाळी उठल्यावर ज्यूस पिण चुकीचं

How Much Juice is Safe

अनेक लोक सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ज्यूस पितात. मात्र ही योग्य सवय नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ज्यूस प्यायलात तर शरिरातील साखरेची पातळी वाढेल.   

8/8

ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती

How Much Juice is Safe

नाश्ता केल्यानंतर ज्यूस पिणं ही सर्वात योग्य वेळ आहे. तुम्ही नाश्ता आणि लंचच्या मध्ये एक ग्लास ज्यूस पिऊ शकता. किंवा लंच आणि डिनरच्या मध्ये ज्यूस पिऊ शकता. पण सकाळी मोकळ्या पोटी ज्यूसचं सेवन करु नका.