हसीन जहाँची शमीकडे दरमहा १० लाखांची मागणी

Apr 11, 2018, 14:40 PM IST
1/7

Mohammed Shami, Hasin Jahan,

Mohammed Shami, Hasin Jahan,

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. याआधी अनेक आरोप लावल्यानंतर शमीची पत्नी हसीन जहाँने आता आणखी एक केस दाखल केलीये. जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केलीये. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केलाय.

2/7

Mohammed Shami, Hasin Jahan,

Mohammed Shami, Hasin Jahan,

हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केलीये. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केलीये. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी. 

3/7

Mohammed Shami, Hasin Jahan,

Mohammed Shami, Hasin Jahan,

हसीनच्या वकिलांच्या मते केसचे गांभीर्य पाहता कोर्टाने यावर लवकरात लवकर सुनावणी द्यावी, कसेच शमीला त्यांची बाजूही मांडण्यास सांगितलेय. दरम्यान, ही केस आपणच जिंकणार असल्याचा विश्वास हसीन जहाँच्या वडिलांना आहे.

4/7

Mohammed Shami, Hasin Jahan,

Mohammed Shami, Hasin Jahan,

हसीन जहाँने मार्चमध्ये शमीविरोधात मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंसारखे आरोप लावले होते. दरम्यान, शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हसीन वारंवार शमीवर आरोप करक होती, तिने शमीवर धमकी दिल्याचा आरोपही केला होता. 

5/7

Mohammed Shami, Hasin Jahan,

Mohammed Shami, Hasin Jahan,

 सुरुवातीला शमीला हे प्रकरण शांततेत मिटवायचे होते. मात्र हसीन जहाँ काही ऐकण्यासच तयार होत नाही हे पाहून त्याने कायद्याचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले.  

6/7

Mohammed Shami, Hasin Jahan,

Mohammed Shami, Hasin Jahan,

बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटने मोहम्मद शमीला क्लीन चिट दिली होती. तसेच त्याला बोर्डाने त्याला ग्रेड बीमध्ये ठेवले होते. तसेच त्याला आयपीएल खेळण्यासही परवानगी दिली होती. बीसीसीआयकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर शमी म्हणाला होता की त्याची देशासाठी खेळण्याची इच्छा आहे.

7/7

Mohammed Shami, Hasin Jahan,

Mohammed Shami, Hasin Jahan,

दोन दिवसांपूर्वीच शमीच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता. या वाढदिवशी शमी आपली पत्नी आणि मुलीच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर पोस्टही केली होती. यात त्याने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.