Health Update: हार्दिक पंड्याला नेमकं झालंय तरी काय?
Hardik Pandya Health Issue: भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान झालेल्या घोटाच्या दुखापतीतून सावरता न आल्याने हार्दिक पांड्या २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला. पण हार्दिक पांड्याला नेमकं झालंय तरी काय?
"आयसीसी मेन्स क्रिकेट विश्वचषकात भारताची दमदार सुरुवात झाली. अगदी सुरुवातीपासूनच भारत सामने जिंकून एक एक टप्पा पुढे जाताना दिसला. मात्र अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या घोटाच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरल्याच्या बातमीने मोठा फटका बसला आहे आणि यामुळे यापुढील सगळ्या सामन्यांना हार्दिक पांड्या मुकणार असल्याचं आयसीसीने सांगितले आहे. सामन्यादरम्यान पांड्याच्या डाव्या घोटाला दुखापत झाली होती आणि आतापर्यंत तो बरा होऊ शकला नाही.ज्यामुळे हार्दिक पांड्या पुढील सामन्यातही सहभागी होणार नाही. पण हार्दिक पांड्याला नेमकं काय झालंय. यातून तो कधी बाहेर पडून मैदानावर दिसेल.. जाणून घ्या.