वयाच्या 52 व्या वर्षी सिंगल आहे 'ही' अभिनेत्री, मुलांविषयी बोलताना म्हणाली, 'कोणीच थांबवू शकत नाही'

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तब्बूचा आज 52 वा वाढदिवस आहे. तब्बूनं आजवर अनेक वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी तब्बू देखील खऱ्या आयुष्यात तितकीच स्ट्रॉंग आहे. दरम्यान, अजूनही तब्बू ही सिंगल का आहे हे जाणून घेऊया...  

| Nov 04, 2023, 15:06 PM IST
1/9

तब्बू

 तब्बूचा आज 4 नोव्हेंबर रोजी 52 वा वाढदिवस आहे. 

2/9

आजही सिंगल

तब्बू आजही सिंगल असून तिच्या कुटुंबात आणि मित्रांसोबत आनंदी आहे. मात्र, अनेकदा तिला लग्न आणि मुलांवरून प्रश्न विचारण्यात येतात. 

3/9

लग्नावर तब्बूचा मोठा खुलासा

तब्बून 2019 मध्ये हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं खुलासा केला होता की एका पुरुषासाठी तिचं करिअर आणि फिरण्याचं स्वप्न सोडायचं नाही.   

4/9

सिंगल असणं म्हणजे...

तब्बून सिंगल असण्यावर म्हणाली की 'रिलेशनशिपच्या बाहेर देखील अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आनंदी ठेवतात. पार्टनर नसल्यानं तुम्हाला एकटं असल्याचं वाटू शकतं, पण एक वाईट पार्टनर असण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं.'

5/9

तब्बूला करायचं होतं लग्न पण...

तब्बूला प्रेम आणि लग्न करायचं होतं, पण तिच्यासोबत असं झालंच नाही. त्याचं कारण तिला कॉम्प्रोमाईज करायला आवडत नाही. 

6/9

पुरुष आणि महिलेचं नात गुंतागुंतीचं असतं

तब्बू म्हणाली, 'एका पुरुषाचं आणि महिलेचं नातं हे गुंतागुंतीचं असतं. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपल्याला प्रेम कळतं, जसे मोठे होतो तशा वेगळ्या गोष्टी कळतात. स्वतंत्र होतो आणि अनेक गोष्टी बदलतात.'

7/9

मला एकटीला जग पाहायचं होतं

मी काम करायचे आणि जगाला एकटीला पाहायचं होतं. जर मी हे सगळं सोडलं असतं तर त्याचा माझ्या अस्तित्वाला नुकसान पोहोचलं असतं.   

8/9

तब्बूसाठी आयडियल रिलेशनशिप

आयडियल रिलेशनशिपवर तब्बू म्हणाला की हे तेव्हा होतं जेव्हा एकत्र असताना यशस्वी होतात. ते नातं तुम्हाला सगळ्या गोष्टीं करण्यास मोकळेपणा देतात. माझे विचार वेगळे आहेत याची मला कल्पना आहे.   

9/9

लग्नाशिवाय मुलं?

लग्न न करता मुलांची आई होण्याविषयी बोलताना तब्बू म्हणाली मला कोणी थांबवू शकत नाही पण जबरदस्ती एका बाळाकडून दोन मुलांकडून मिळणारं प्रेम काढून घ्यायचं नाही. (All Photo Credit : Tabu Instagram)