दीपिका पदुकोणचा शेजारी झाला 'हा' मराठमोळा गायक; मुंबईत खरेदी केलं तब्बल 7 कोटींचं आलिशान घर

मराठमोळ्या गायकाने दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या शेजारी मुंबईत 16 व्या मजल्यावर घेतलं 7 कोटींचं आलिशान घरं. 

| Nov 07, 2024, 18:48 PM IST
1/6

बॉलिवूड कलाकार

काही दिवसांपासून बॉलिवूडमधील कलाकारांनी नवीन घरं खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबईत स्वत: चे घर खरेदी केले आहे. 

2/6

अवधूत गुप्ते

मराठमोळा गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते याने खार पश्चिम या ठिकाणी 7 कोटी 75 लाख रुपयांना आलिशान घर विकत घेतलं आहे.   

3/6

आलिशान घर

हे आलिशान घर अवधूत गुप्ते आणि त्याची पत्नी गिरिजा गुप्ते या दोघांनी मिळून खरेदी केलं आहे. 

4/6

खार परिसर

अवधूत गुप्ते याचे नवीन खरेदी केलेले घर मुंबईतील खार परिसरातील रुस्तमजी पॅरामाउंट नावाच्या इमारतीमध्ये 16 व्या मजल्यावर आहे.

5/6

स्टॅम्पड्युटी

रिपोर्टनुसार, अवधूत गुप्तेने या घरासाठी 46 लाख 48 हजार रुपये इतकी स्टॅम्पड्युटी भरली असून 30 हजार रुपये नोंदणीशुल्क भरलं आहे.

6/6

अमृता खानविलकर

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. तिने सोशल मीडियावर देखील या घराचे फोटो शेअर केले आहेत.