जगातील असा एक देश जिथे लोक इंटरनेटचा वापर करत नाहीत

जगभरात प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट वापरण्याची सवय लागली आहे. पण असा एक देश आहे जिथे लोक इंटरनेटचा वापर करत नाहीत. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Nov 08, 2024, 14:05 PM IST
1/7

इंटरनेट

आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा इंटरनेटशी जोडला गेला आहे. परंतु जगात असा एक देश आहे जिथे आजही लोक इंटरनेटचा वापर करत नाहीत.

2/7

उत्तर कोरिया

आम्ही उत्तर कोरियाबद्दल बोलत आहोत. ज्याला जगातील सर्वात रहस्यमय देश म्हणून ओळखले जाते. कारण हा देश बाहरेच्या जगापासून पूर्णपणे अलिप्त आहे.   

3/7

मर्यादित वापर

उत्तर कोरियामध्ये इंटरनेटचा वापर हा अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे खूपच कठीण आहे. 

4/7

इंट्रानेट

या ठिकाणी इंटरनेट ऐवजी स्थानिक इंट्रानेट वापरले जाते. या इंट्रानेटवर फक्त सरकार मान्यताप्राप्त वेबसाइट आणि माहिती उपलब्ध आहे. 

5/7

इंटरनेटवर निर्बंध

उत्तर कोरियामध्ये इंटरनेटवर निर्बंध घालण्याचे कारण म्हणजे, इंटरनेटमुळे लोकांच्या मनात चुकीचे विचार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शासन व्यवस्था कमकुवत होऊ शकते, असं सरकारचं मत आहे. 

6/7

सरकारच्या विरोधात

येथील नागरिकांनी बाहेरच्या जगाच्या प्रभावाखाली येऊन सरकारच्या विरोधात जावू नये. लोकांना फक्त सरकारला हवी असणारी माहिती मिळावी अशी त्या सरकारची इच्छा आहे. 

7/7

नुकसान

त्यामुळे तेथील लोकांना अनेक गोष्टीचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांना जगात होणाऱ्या घटनांबद्दल फारच कमी माहिती आहे.