PHOTO : टॅक्सी ड्रायव्हर, वेटर म्हणून केलं काम; बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही मिळवलं नाव, एका चित्रपटासाठी घेतो 20 कोटींचं मानधन

Entertainment : एक काळ असा होता या अभिनेत्याला जगण्यासाठी कधी वेटर, तर कधी टॅक्सी ड्रायव्हर, अगदी कारही धुवावी लागली. पण आज त्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव मिळवलंय.

नेहा चौधरी | Aug 20, 2024, 09:17 AM IST
1/8

अभिनेत्याने त्याच्या गंभीर अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकलीय. आज त्याच्याकडे प्रसिद्धीसोबत अपार संपत्ती आहे. पण त्याला या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला. 

2/8

आम्ही इथे बोलत आहोत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाविषयी... रणदीप हुड्डा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणातील रोहतक इथे झाला. आज तो त्याचा 48 व्या वाढदिवस साजरा करतोय. हरियाणाच्या मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्समधून शिक्षण घेतलेल्या रणदीपला सुरुवातीपासूनच खेळात खूप गोडी होती. 

3/8

रणदीपने शालेय जीवनात विविध खेळांमध्ये भाग घेत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. पण त्याला कायम अभिनयाची आवड होती. पण त्याला पुढील  शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जावं लागलं. 

4/8

ऑस्ट्रेलियात त्याने पदव्युत्तर शिक्षणात मानव संसाधन विषयात एमबीए केलं. मात्र, परदेशात राहताना या अभिनेत्याला खूप संघर्ष करावा लागला होता. 

5/8

ऑस्ट्रेलियात राहत असताना रणदीप वेटर म्हणून काम करत होता. एवंढच नाहीतर टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही त्याने काम केलं. कधी लोकांच्या गाड्या धुवून पैसे कमवावे लागले. 

6/8

नंतर अभिनेता मायदेशात परतला आणि त्यांनी मॉडेलिंग सुरू केले. थिएटरमध्येही प्रवेशही केला. मॉन्सून वेडिंग (2001) मधून त्याने अभिनयात पदार्पण केलं. 

7/8

रणदीपने 'एक्स्ट्रॅक्शन' या हॉलिवूड चित्रपटातही काम केलंय. भरपूर प्रसिद्धीसोबतच त्यांनी आज अमाप संपत्तीही कमावली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, रणदीप हुडाची एकूण संपत्ती 80 कोटींच्या घरात आहे. 

8/8

तर रणदीप हा प्राणीप्रेमी असून फोर्ब्स इंडियाच्या अहवालानुसार रणदीपकडे 6 घोडे आहेत. तर GQ च्या रिपोर्टनुसार, अभिनेता त्याच्या प्रोजेक्टसाठी 20 कोटी मानधन आकारतो. याशिवाय एंडोर्समेंटसाठी 50 लाख रुपये घेतो. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएल 350 सीडीआय, व्होल्वो व्ही90 सारख्या कारचं कलेक्शन आहे.