PHOTO : 10 मिनिटांचं अंतर, तरीही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या घरी का जात नाहीत?, पतीहूनही आहेत श्रीमंत, पाहा Net Worth

Happy Birthday Hema Malini : हेमा मालिनी आज त्यांचा 76 वा वाढदिवस असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधील अम्मानकुडीमध्ये झाला. द ड्रीम गर्ल या धर्मेंद्र यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. 10 मिनिटांचं अंतर असून हेमा मालिनी कधीही त्यांच्या घरी गेल्या नाहीत. पण मुलींना वडिलांच्या घरी जायला किती वर्ष लागले माहितीये का?

Oct 16, 2024, 09:53 AM IST
1/16

बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी आपल्या कारकिर्दीत 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. बसंती असो की ड्रीम गर्ल, मीरा बाई असो त्यांनी प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. आजच्या काळात त्यांनी बॉलिवूड ते राजकारण असा यशस्वी प्रवास त्या करत आहेत. 

2/16

एकेकाळी खूप बारीक असल्याने त्यांना तमिळ चित्रपटांमधून नाकारण्यात आलं. पण त्या निराश न होत्या साऊथ नाही तर मग त्यांनी बॉलिवूडचा रस्ता धरला. हेमा मालिनी यांचं आडवान चक्रवर्ती आहे. दसऱ्यानंतर चक्रवर्ती कुटुंबात मुलीचा जन्म झाला. त्यात हे कुटुंब लक्ष्मीची निस्सीम भक्त असल्याने त्यांनी मुलीचं नाव हेमा मालिनी ठेवलं. 

3/16

1972 मध्ये 'सीता और गीता'मध्ये दुहेरी भूमिका साकारली होती. हा सुद्धा त्या काळातील आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट होता. दिलीप कुमारच्या 'राम और श्याम'च्या धर्तीवर हा चित्रपट स्त्री पात्रांवर केंद्रित आहे. दोन जुळ्या बहिणी ज्यांची शैली एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. हेमाने दोन्ही पात्रांना पूर्ण न्याय दिला. संजीव कुमार आणि धर्मेंद्र हे दोघेही त्यांच्या विरुद्ध काम करत होते.

4/16

'दिल आशना है' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. ईशा-अहानाला आई म्हणून वाढवले, राज्यसभेत पोहोचले आणि नंतर लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले. मथुरेतून एकदा नव्हे तर तीनदा खासदार विजयी, कलेबद्दलचे समर्पण अजूनही कायम आहे.

5/16

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी खूप चर्चेत असते. बॉलिवूडमधील कोणत्याही जोडप्याच्या प्रेमकथेचा उल्लेख केल्यावर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते हेमा आणि धर्मेंद्र. विवाहित धर्मेंद्र यांना हेमाला स्वतःचे बनवण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागला.  

6/16

हेमासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. धर्मेंद्र यांनीही इस्लाम धर्म स्वीकारला होता. हेमा मालिनी यांनी त्यांच्या चरित्र 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' मध्ये लिहिलंय की, धर्मेंद्रने तिला पहिल्यांदा एका चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान पाहिलं होतं. जेव्हा हेमाला स्टेजवर बोलावण्यात आलं तेव्हा धर्मेंद्र यांनी शशी कपूर यांना सांगितलं की कुड़ी बड़ी चंगी है. हेमा मालिनी यांनी हे ऐकले होतं, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

7/16

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 'तुम हसीन मैं जवान' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं. हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दोघांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील होते. यामुळे सुरुवातीला हेमा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, पण नंतर तीही धर्मेंद्रच्या प्रेमात पडली. 

8/16

हेमा मालिनी यांचे वडील त्यांच्या नात्याच्या विरोधात होता. हेमाने विवाहित पुरुषाशी लग्न करावे असे त्यांना वाटत नव्हते. असं म्हटलं जातं की, तिच्या आई-वडिलांच्या दबावामुळे हेमाने जितेंद्रशी लग्न करण्यास होकार दिला होता, पण धर्मेंद्र यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते संतापले. तो हेमाच्या लग्नाला पोहोचला होता आणि तिथे चांगलाच गोंधळ घातला होता.

9/16

धर्मेंद्रची ही कृती पाहून हेमाच्या वडिलांनी अभिनेत्याला 'तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून का बाहेर पडत नाहीस' असं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर हेमाने जितेंद्रसोबतचे लग्न मोडलं. हेमा मालिनी यांच्या वडिलांचं 1978 मध्ये निधन झालं. त्या काळात हेमा मालिनी यांचं आयुष्य दु:खाने भरलेले होतं. मग धर्मेंद्र हेमा मालिनी यांचा आधार बनले आणि त्यांना एकटे सोडले नाही. या दु:खाच्या काळात धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना पूर्ण पाठिंबा दिला.

10/16

धर्मेंद्र यांचा प्रकाश कौर यांच्याशी विवाह झाला होता. अशा परिस्थितीत कायदेशीरदृष्ट्या तो हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न करू शकत नव्हता. अशा परिस्थितीत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर दोन्ही स्टार्सने 1980 मध्ये लग्न केले आणि त्यानंतर त्यांचे प्रेम पूर्ण झाले.

11/16

10 मिनिटांचं अंतर असून हेमा मालिनी धर्मेंद्राच्या घरी का जात नाही याचं कारण 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल'  या पुस्तकात सांगितलंय. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेमा मालिनी यांना कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही.मात्र, लग्नापूर्वी अभिनेत्री धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना अनेक कार्यक्रमांमध्ये भेटली आहे. पण, लग्नानंतर दोघेही एकमेकांसमोर आले नाहीत. 

12/16

हेमा मालिनी यांच्या मुलींना वडील धर्मेंद्र यांच्या घरी जायला 34 वर्षे लागली. खरंतर परिस्थिती अशी होती की जेव्हा धर्मेंद्र यांचा भाऊ आणि अभय देओलचे वडील अजित सिंह देओल खूप आजारी होते. तेव्हा ईशाला तिच्या काकांना भेटायचे होते. तिला तिच्या बाजूने आदर द्यायचा होता. त्याचे त्याच्यावर आणि अहानावर खूप प्रेम होते आणि अभयच्या खूप जवळ आहे.

13/16

ईशा देओल, सनी, बॉबी आणि अभय देओल यांच्यामधे क्लोज बाँडिंगही पाहायला मिळाले आहे. 'गदर 2' च्या रिलीजच्या वेळी ईशा देओलने तिच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. त्याचवेळी हेमा मालिनी यांनीही अभिनेत्याचे खूप कौतुक केले.

14/16

मथुराच्या तिसऱ्यांदा खासदार झालेल्या हेमा मालिनी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 49 कोटी रुपयांची वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती  298 कोटींच्या घरात आहे. निवडणुकीच्या वेळी हेमा यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील दिला होता. त्यानुसार हेमा मालिनी यांच्यावर 1.42 कोटी रुपयांचे कर्जही आहे. 

15/16

प्रतिज्ञापत्रानुसार 298 कोटी रुपयांपैकी 129 कोटी रुपयांची संपत्ती हेमा मालिनींच्या नावावर तर169 कोटी रुपयांची संपत्ती पती धर्मेंद्र यांच्या नावावर आहे. हेमा यांच्याकडे 13.52 लाख रुपये, पती धर्मेंद्र यांच्याकडे 43.19 लाख रुपये रोख आहेत. हेमा यांच्याकडे बँकेत 1.13 कोटी रुपये आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये 4.28 कोटी रुपये आहेत. त्यांना वारसाहक्काने 2.96 कोटी रुपयांची संपत्ती मिळाली आहे. 2.57 कोटींचे शेअर्स आहेत.

16/16

हेमा मालिनी यांना दागिन्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे 3.39 कोटी रुपयांचे दागिने आहेत. 9 कोटी 36 लाख रुपयांची घरे आणि अपार्टमेंट आहेत. इतर तात्पुरती जंगम मालमत्ता 29 लाख 53 हजार रुपये आहे.