शिंदे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांच्या पक्षातील रुपाली चाकणकरांना सरप्राइज; आता पुढील...

Good News For Rupali Chakankar: राज्यातील महिला नेतृत्वांपैकी एक महत्त्वाचं नाव असलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य सरकारने एक सुखद धक्का दिला आहे. नेमका काय निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Oct 16, 2024, 08:43 AM IST
1/12

rupalichakankar

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली त्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्या रुपाली चाकणकरांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचबद्दल जाणून घेऊयात...

2/12

rupalichakankar

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याच्या तीन तास आधीच राज्यातील भारतीय जनता पार्टीचं प्रमुख महिला नेत्यांपैकी एक असलेल्या चित्रा वाघ यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडली.   

3/12

rupalichakankar

रुपाली चाकणकरांना विधान परिषदेमध्ये आमदारकी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्याविरोधात पुण्यातील पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी उघडपणे नाराजी व्यक्त करत इतरांनाही संधी देण्याची मागणी केली होती. यावरुन मोठा वादही झाला होता.

4/12

rupalichakankar

मात्र एकीकडे भाजपाच्या चित्रा वाघ यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आल्यानंतर या यादीतून डावलेलल्या रुपाली रुपाली चाकणकरांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.

5/12

rupalichakankar

एकीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भातील घोषणेबद्दलची उत्सुकता लागून राहिलेली असताना दुसरीकडे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेत रुपाली चाकणकर यांना सुखद धक्का दिला.

6/12

rupalichakankar

अजित पवारांनी मागील वर्षी जून महिन्यात केलेल्या बंडानंतर ज्या प्रमुख नेत्यांनी त्यांना साथ दिली त्यामध्ये रुपाली चाकणकरांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या असलेल्या रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.

7/12

rupalichakankar

अजित पवारांच्या पक्षातील महत्त्वाच्या भूमिका पार पाडतानाच रुपाली चाकणकरांकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदही आहे. 

8/12

rupalichakankar

रुपाली चाकणकरांकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. लवकरच त्यांचा या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार होता. मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

9/12

rupalichakankar

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या रुपाली चाकणकरांच्या नियुक्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

10/12

rupalichakankar

नव्या निर्णयानुसार रुपाली चाकणकर या आता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 2027 पर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. 

11/12

rupalichakankar

अदिती तटकरेंकडे मंत्रिपद असलेल्या महिला आणि बाल विकास विभागाकडून रुपाली चाकणकरांना तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देत असल्याचा आदेश जारी केला आहे.  

12/12

rupalichakankar

रुपाली चाकणकरांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्यात आलं नसलं तरी अजित पवारांच्या पक्षातील माजी आमदार पंकज भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे.