Hairstyles For Women : लग्नासाठी खास हेअर स्टाईल, फॉलो करा 'या' टिप्स

Hairstyle Tips in Marathi : लग्न म्हटलं की  वधु-वर यांच्यासह कुटूंबाला ही सुंदर तयारी करायची असते. लग्नामध्ये कपडे, दागिने, मेकअप यासारख्या प्रश्नांनी अनेकांची तारांबळ उडते. लग्नात सर्वात खास आणि अनोखे दिसण्यासाठी आपल्यापैकी अनेक स्त्रिया आधीच खरेदी सुरू करतात. 

Jan 10, 2024, 14:19 PM IST

Hairstyle Tips in Marathi : लग्न म्हटलं की  वधु-वर यांच्यासह कुटूंबाला ही सुंदर तयारी करायची असते. लग्नामध्ये कपडे, दागिने, मेकअप यासारख्या प्रश्नांनी अनेकांची तारांबळ उडते. लग्नात सर्वात खास आणि अनोखे दिसण्यासाठी आपल्यापैकी अनेक स्त्रिया आधीच खरेदी सुरू करतात. स्कार्फपासून मेकअपपर्यंत आपण लग्नात घालतो त्या पोशाखाची आपण खूप काळजी घेतो, पण कधी कधी आपण आपली हेअरस्टाइल योग्य प्रकारे निवडत नाही. त्यामुळे आपल्या लग्नातील संपूर्ण लुक खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आज आम्ही तुम्हाला काही खास आणि ट्रेंडी हेअरस्टाइल दाखवणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या लग्नासाठी सहज बनवू शकता. ज्यामुळे तुमचा लुक आणखी खास दिसेल. चला तर मग जाणून घेऊया खास हेअर स्टाईल..

1/7

मेसी बन

ब्रायडल लुकसाठी तुम्ही मेसी बन देखील बनवू शकता. आजकाल ही हेअरस्टाईल खूप ट्रेंडमध्ये आहे. हेअर टूल वापरून केसांना वेव्ही स्टाइल द्या. यानंतर केसांना हेअर अॅक्सेसरीज आणि फुलं लावून लूक पूर्ण करा. 

2/7

फ्रेंच बन विद गजरा

फ्रेंच ब्रेड विद गजरा हेअरस्टाईल जर तुम्ही तुमच्या लग्नात साडी नेसत असाल, तर फ्लावर बन   हेअरस्टाईल   तुमच्यासाठी सर्वोत्तम केशरचना असेल. लग्नाव्यतिरिक्त इतर कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही ही हेअरस्टाईल सहज बनवू शकता. 

3/7

गुलाबाच्या फुलांसह खजूर वेणी

नवरीचे केस लांबसडक असतील तर तुम्ही तिच्यावर ही हेअर स्टाईल नक्कीच करू शकता. खजूरवेणी घालून तिच्या ड्रेसच्या अथवा साडीच्या रंगाची गुलाबाची फुले खजूर वेणीच्या प्रत्येक भागात अडकवायची. हे दिसायला अतिशय सुंदर दिसते. एका पानासह गुलाबाचे फूल त्यात अडकवून सुंदर हेअरस्टाईल करू शकता. दिसायलाही अत्यंत आकर्षक दिसते.  

4/7

फुलांनी सजवलेले ओपन कर्ल्स

तुम्ही केसांना जर सुंदर कलर केला असेल आणि रिसेप्शनसाठी लेहंगा घालणार असाल तर तुम्ही तुमच्या केसांना खालून कर्ल करा आणि त्यावर तुमच्या ड्रेसच्या रंगाप्रमाणे फुलांचा रंग निवडा आणि केसांची हेअरस्टाईल करा. दोन्ही बाजूंनी लहान वेण्या घालून एकत्र मागे घ्या आणि खाली केस कर्ल करून त्यामध्ये फुलांची आरास करा. दिसायला हे खूपच आकर्षक आणि सुंदर दिसते. नवरीचा लुक अगदी वेगळा आणि उठून दिसेल.

5/7

आर्टिफिशियल फुलांचा करा वापर

जर दिवसभर तुम्हाला जर केसांमध्ये ताज्यातवान्या फुलांचा आभास हवा असेल तर तुम्ही आर्टिफिशियल फुलांचा वापर करा. नवरीचे केस मोठे असतील तर अशी आर्टिफिशियल गुलाबाची आणि इतर फुलंही खूपच सुंदर दिसतात. मोठ्या केसांचा आंबाडा बांधून तुम्ही त्यावर अप्रतिम फुलांनी सजवा आणि दिसा अधिक सुंदर 

6/7

हेअर अ‍ॅक्सेसरीजसह थोडा हलकासा आंबाडा

बाजारामध्ये अनेक हेअर अॅक्सेसरीज मिळतात. तुमच्या लेहंगा अथवा साडीप्रमाणे तुम्ही रंगाची निवड करून केसांना थोडासा वेगळा लुक देण्यासाठी सैलसर आंबाडा बांधून त्यावर या हेअरपिनचा उपयोग करावा. या हेअर अॅक्सेसरीज फुलांच्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या असतात. त्यामुळे साडी आणि लेहंग्यावर शोभून दिसतात. 

7/7

फुलांच्या गजऱ्यासह आंबाडा

फुलांच्या गजऱ्यासह आंबाडा ही फार जुनी फॅशन आहे. पण हीच फॅशन कायमस्वरूपी आकर्षित करणारी आहे. नवरीचा लुक पारंपरिक हवा असेल तर तुम्ही केसांचा अंबाडा घालून त्यावर फुलांचे गजरे माळा. व्यवस्थित माळलेले आणि अंबाड्याभोवती गुंडाळलेले गजरे तुमचा लुक अधिक भारदस्त आणि पारंपरिक करतात. परफेक्ट नवरीच्या लुकसाठी आणि नऊवारी साडीवर मराठमोळ्या लुकसाठी ही हेअरस्टाईल परफेक्ट आहे.