'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य

Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं.   

Jan 10, 2024, 14:01 PM IST

Travel News : जगाच्या पाठीवर फिरणयासाठी किंवा Explore करण्यासाठी अनेकदा नव्या ठिकाणांना भेट देण्याकडेच फिरस्त्यांचा कल दिसतो. पण, काही ठिकाणांपर्यंत पर्यटक पोहोचूनही तेथील रहस्याचा मात्र जगासमोर उलगडा होतच नाही. 

 

1/7

दडली आहेत अनेक रहस्य

secret behind hunza valley women beauty and long life

Interesting Travel Facts : तुम्हीही पर्यटनाच्या दृष्टीनं सातत्यानं काही नवी ठिकाणं शोधत असता का? एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात जाता आलं नाही, तरीही त्या ठिकाणाची व्हर्च्युअल सफर नक्कीच करता येते. जगातलं 'हे' एक ठिकाण तुम्ही असंच घरबसल्या फिरू शकता. कारण, इथं दडली आहेत अनेक रहस्य.   

2/7

उतारवयातलं सौंदर्य

secret behind hunza valley women beauty and long life

धकाधकीच्या आयुष्यात जिथं शरीरावर घातक परिणाम होतात, चाळीशीतली मंडळीसुद्धा पन्नाशीतल्या माणसाप्रमाणं तक्रारी करतात तिथंच हे ठिकाण म्हणजे मानवी जीवनासाठी वरदानच. कारण, इथं एका व्यक्तीचं सरासरी आयुर्मान 90 ते 110 वर्षे आहे. 

3/7

150 वर्षांचं आयुष्य

secret behind hunza valley women beauty and long life

जगाच्या एका कमाल भौगोलिक रचनेत स्थिरावलेलं हे ठिकाण पाकिस्तानमध्ये असून ते हुंजाचं खोरं किंवा हुंजा व्हॅली म्हणून ओळखलं जातं. पाकिस्तानचा स्वर्ग म्हणूनही या ठिकाणाचा उल्लेख केला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे हुंजा व्हॅली भागात असणाऱ्या महिलांनाही जास्त आयुर्मान असून, त्या 150 वर्षेही जगतात असं सांगितलं जातं.   

4/7

हुंजा व्हॅली

secret behind hunza valley women beauty and long life

हुंजा व्हॅलीतील महिलांच्या सौंदर्याबद्दल अनेक गोष्टी आजवर लिहिल्या वाचल्या गेल्या आहेत. इथं महिलांनी 60 चं वय ओलांडलं तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नसते. चमकदार नितळ त्वचा, लाघवी हास्य, निळेशार डोळे आणि घायाळ करणारी नजर ही येथील महिलांच्या सौंदर्याची वैशिष्ट्य.   

5/7

साठीच्या वयातही गर्भधारणा

secret behind hunza valley women beauty and long life

जिथं शहरी भागांमध्ये महिलांना चाळीशीनंतर गर्भधारणेमध्ये असंख्य अडचणी उदभवतात तिथं हुंजातील महिला मात्र साठीनंतरही सहज गर्भधारणा करू शकतात. येथील वातावरण, खाण्यापिण्याच्या लाभदायक सवयी या साऱ्याचा परिणाम येथील महिलांच्या आरोग्यावर आणि सौंदर्यावर होतो असं सांगितलं जातं. इथली प्रत्येक महिला खऱ्या अर्थानं 'मल्लिका-ए-हुस्न' आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.   

6/7

सिंकदरचे वंशज

secret behind hunza valley women beauty and long life

हुंजा व्हॅली किंवा हुंजाचं हे खोरं, जगातील हे एक खऱ्या अर्थानं सुंदर असणारं गाव पाकव्याप्त काश्मीरमध्ये असून, गिलगिट- बाल्टीस्तानच्या पर्वतरांगांमध्ये वसलं आहे. इथं हुंजा प्रजातीची मोठी लोकवस्ती आहे. असं म्हणतात की ही प्रजाती म्हणजे सिंकदरचे वंशज आहेत. पण, याबाबत कोणताही अधिकृत पुरावा मात्र नाही हेसुद्धा नाकारता येत नाही.  

7/7

चिरतारुण्य

secret behind hunza valley women beauty and long life

सुकामेवा, बाजरी, सातू या आणि अशा पदार्थांचा समावेश येथील नागरिकांच्या दैनंदिन आहारात असतो. कैक मैलांची पायपीट हा त्यांच्या आयुष्याचा भाग, तहान लागली तर, हिमशिखरांवरून येणाऱ्या नद्यांचं पाणी त्यांची तहान भागवण्याचं ताम करतं. अशा या गावात आजही आजारपणांवर उपचार म्हणून आयुर्वेदीच उपचारपद्धती अवलंबली जाते.