बसल्या जागेवर पाय हलवणे अशुभ की शुभ? तुम्हाला ही सवय असेल तर कामाची बातमी

Astro Tips : बसल्या जागेवर अनेकांना पाय हलवण्याची सवय असते. पण ही सवय ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ जाणून घ्या. यामागे वैज्ञानिक कारणही आहे. 

नेहा चौधरी | Dec 10, 2024, 17:41 PM IST
1/7

बसल्या जागेवर किंवा झोपले असताना पाय हलवणे ही वाईट सवय मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार याचा संबंध थेट आपल्या आरोग्य आणि संपत्तीशी जोडला गेला आहे. 

2/7

शास्त्रानुसार उंच खाट, खुर्ची, पलंग इत्यादींवर बसून किंवा झोपताना पाय हलवल्यास कुंडलीतील चंद्राची स्थिती कमजोर होते. अशा स्थितीत चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. 

3/7

चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला कोणत्याही कामात शांती मिळत नाही. शिवाय आरोग्य किंवा आर्थिक संकटाने समस्या निर्माण होतात. पैसा पाण्यासारखा वाहून जातो. 

4/7

बसल्या जागेवर पाय हलवल्याने माता लक्ष्मी नाराज होती, असे मान्यता आहे. त्यामुळे घरात पैसा टिकत नाही. घरावर आर्थिक संकट कोसळून गरीबीच्या मार्गाकडे वाटचाल होते. 

5/7

पूजेला बसून पाय हलवल्यास उपवास निष्फळ ठरतो. कारण या प्रथेमुळे लोकांची मानसिक क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत कोणीही निर्णय घेण्यास तुम्ही सक्षम मानले जात नाही. 

6/7

ही झाली ज्योतिषशास्त्रानुसार कारणं तर यामागे वैज्ञानिक कारणही आहे. विज्ञानातही पाय हलवणे आरोग्यासाठी वाईट मानले जाते. वैद्यकीय शास्त्रात पाय हलवण्याच्या सवयीला रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम म्हणतात. हा एक प्राणघातक आजार आहे. या आजारामुळे हृदय, किडनी, पार्किन्सन्सचा त्रास वाढतो.

7/7

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)