ग्राहकांनो! सोने-चांदी खरेदीची ही संधी सोडू नका, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीसाठी सध्या चांगली संधी असून फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान नवा विक्रम करणाऱ्या सोन्याने सध्या नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सोन्या आणि चांदीच्या दरवाढीला सध्या ब्रेक लागला असून तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करु शकतात.

Jun 15, 2023, 12:07 PM IST
1/5

आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सराफा बाजारातच मौल्यवान धातू स्वस्त झाले आहेत. मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट प्रति ग्रॅम 5,470 रुपये आणि 24 कॅरेट म्हणजे 999 ग्रॅम सोन्याचा भाव 5,967 रुपये आहे.  

2/5

gold silver price today

सराफा बाजारात आजच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 300 हुन अधिकने घसरण नोंदवली आहेत. त्यामुळे देशातील बाजारपेठेतील दरांमध्ये तफावत असेल. 

3/5

gold silver price today

सोने सध्या 2,238 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. 

4/5

gold silver price today

चांदीचा दर 72173 रुपये प्रतिकिलो इतका होता. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदी 73,169 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. अशाप्रकारे चांदीचा दर 996 रुपयांनी घसरला.  

5/5

gold silver price today

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला आजचे दर एसएमएसद्वारे समजतील. सतत अपडेट्ससाठी तुम्ही IBJA च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.