अंतराळवीराने Space मधून टिपलं बिपरजॉय वादळाचं विक्राळ रुप; पाहा PHOTOS

अंतराळवीर सुलतान अलनेयादी यांनी अरबी समुद्रावरील चक्रीवादळ बिपरजॉयच्या अंतराळातून टिपलेले फोटो शेअर केले आहेत.   

| Jun 15, 2023, 12:08 PM IST

1/7

astronaut clicks pictures of Cyclone Biparjoy from space

बिपरजॉय वादळ आज भारतात धडकणार असून यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चारनंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकणार आहे.  

2/7

astronaut clicks pictures of Cyclone Biparjoy from space

बिपरजॉय वादळ आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेले वादळ आहे. अरबी समुद्रातून नेऋत्येकडे घोंघावत निघालेल्या या वादळामुळे मुंबई, ठाणे तसेच पालघर या महाराष्ट्रातील जिल्ह्यांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.   

3/7

astronaut clicks pictures of Cyclone Biparjoy from space

यादरम्यान, अंतराळवीर सुलतान अलनेयादी यांनी अंतराळातून हे वादळ कॅमेऱ्यात टिपलं आहे.   

4/7

astronaut clicks pictures of Cyclone Biparjoy from space

सुलतान अलनेयादी यांनी हे फोटो ट्वीट केले आहेत. स्पेस स्टेशनमधून हे फोटो टिपण्यात आले असून ज्यात अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ दिसत आहे. गेले दोन दिवस हे फोटो काढण्यात आले आहेत.   

5/7

astronaut clicks pictures of Cyclone Biparjoy from space

6 जून 2023 रोजी अरबी समुद्रावर तीव्र चक्रीवादळ तयार झालं आहे. वादळात ताशी 125 किमी वेगाने वारे वाहत आहेत. ताशी 15 किलोमीटर वेगाने वादळ वायव्येकडे सरकत आहे.  

6/7

astronaut clicks pictures of Cyclone Biparjoy from space

भारतीय हवामान खात्याने (IMD) गुजरातसाठी रेड अलर्ट जारी केला असून, जोरदार अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे. खडबडीत महासागर आणि उच्च वाऱ्याच्या वेगामुळे कच्छला वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.   

7/7

astronaut clicks pictures of Cyclone Biparjoy from space

या वादळाचा थेट तडाखा कच्छसह देवभूमी द्वारका, पोरबंदर आणि राजकोट या भागांना बसणार असून किनारपट्टी भागांतील जवळपास ५० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.