घरातलं सोनं Dead Investment वाटतंय? मग हे वाचाच; 2516 कोटींचा मालक म्हणतो, 'भारतीय..'
Gold In Lockers Indian Women Connection Veteran investor Comment: सोनं घेऊन ठेवावं की नाही? याबद्दल भारतीयांमध्येच दोन गट दिसून येतात. मात्र जागतिक स्तरावरील नामांकित गुंतवणूकदाराने सोन्यातील गुंतवणुकीसंदर्भात भारतीय महिलांचा उल्लेख करत केलेलं विधान अनेकांनाचा आश्चर्याचा धक्का देणार आहे. या गुंतवणूकदाराने नेमकं काय म्हटलं आहे. सोनं ही डेड इनव्हेस्टमेंट आहे का? याचसंदर्भात जाणून घ्या...
Swapnil Ghangale
| Sep 01, 2024, 15:51 PM IST
1/10
2/10
सोनं ही डेड इनव्हेसमेंट म्हणजेच फारसा परतावा न देणारी गुंतवणूक आहे का? या विषयावर मतमतांतरे आहेत. खास करुन भारतीयांमध्ये या पिवळ्या धातूचा वापर अधिक असून त्यामुळेच त्यामध्ये गुंतवणुकीचं प्रमाणही अधिक असतानाच सोन्यामधून परतावा किती मिळतो हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र भारतीयांच्या या सोन्यावरील प्रेमासंदर्भात जागतिक स्तरावरील एका दिग्गज गुंतवणूकदाराने केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
3/10
प्रसिद्ध गुंतवणूकदार जीम रॉजर्स यांनी सोनं आणि चांदीसंदर्भात फार महत्त्वाचा धडा आपण भारतीय बाजारपेठेमधून घेतल्याचं म्हटलं आहे. सध्या सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या जीम यांनी 'एनडीटीव्ही प्रॉफीट'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय महिलांना सोन्यासंदर्भात असलेल्या ओढीमधून गुंतवणुकीसंदर्भात आयुष्यभराचा धडा मिळाल्याचं म्हटलं आहे.
4/10
5/10
6/10
7/10
"सोन्यासंदर्भात भारतीयांचा आणि भारत सरकारचा दृष्टीकोन काय आहे मला ठाऊक आहे. मात्र जेव्हा आर्थिक संकट येतं तेव्हा तुमच्याकडे सोनं असेल तर तुम्हाला हायसं वाटतं. असं संकट येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. मात्र आलं तर आपल्याकडे थोडं सोनं, चांदी असेल तर अधिक सुरक्षित नक्कीच वाटतं," असं जीम यांनी सोनं डेड इनव्हेस्टमेंट नसल्याबद्दल भाष्य करताना म्हटलं.
8/10
9/10