किंग कोहलीला धक्का! 14.25 कोटींचा मॅक्सवेल सोडणार RCB ची साथ, IPL 2025 मध्ये 'या' संघाकडून खेळणार

Glenn Maxwell Unfollow RCB : ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे आणि आरसीबीऐवजी तो नवीन फ्रँचायझीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Saurabh Talekar | Jul 30, 2024, 21:27 PM IST
1/5

बीसीसीआय मिटिंग

आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव पार पडणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने देखील कंबर कसली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि फ्रँचायझी मालकांमध्ये यासाठी 31 जुलै रोजी मिटिंग होईल.

2/5

आरसीबी

आयपीएल लिलावापूर्वी फ्रँचायझींना मोठे निर्णय घ्यावे लागतील. अशातच आता आरसीबीमधून मोठी बातमी समोर आली आहे. आरसीबीमधून ग्लेन मॅक्सवेलला डच्चू मिळू शकतो.

3/5

मॅक्सवेलला नारळ?

ग्लेन मॅक्सवेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याने आता मॅक्सवेल आरसीबीला रामराम ठोकणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.

4/5

आरसीबी नाही मग कोण?

आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला संघात कायम ठेवलं नाही तर मॅक्सवेल हैदराबाद किंवा लखनऊच्या जर्सीमध्ये दिसू शकतो. तर गुजरात देखील त्यावर डाव लावू शकते.

5/5

14.25 कोटी

दरम्यान, आरसीबीने मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांना करारबद्ध केलं होतं. पण मागील आयपीएल हंगामात त्याला 10 सामन्यांत केवळ 52 धावा करता आल्या. त्यामुळे आरसीबी मॅक्सीबाबत गंभीर निर्णय घेऊ शकते.