Vastu Tips: 'या' वस्तू कधीही दान करू नयेत; आर्थिक दारिद्र येण्याची असते शक्यता

Vastu Tips: हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व दिलं गेलंय. जे लोक दान करतात त्यांना पुण्यवान म्हणतात. असं मानलं जातं की, जे दान करतात त्यांना अनेक जन्मांसाठी शुभ फळ मिळतात, परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे दान करणे अत्यंत अशुभ मानले जाते.   

| Jul 30, 2024, 20:38 PM IST
1/7

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, तुम्ही कधीही कोणत्याही व्यक्तीला झाडू दान करू नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. 

2/7

हिंदू धर्मानुसार प्लास्टिकच्या वस्तू दान करणे चांगले मानलं जात नाही. 

3/7

कात्री किंवा चाकू यांसारख्या धारदार वस्तू कोणालाही दान करू नयेत. असे केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो.

4/7

चुकूनही स्टीलची भांडी कोणालाही दान करू नयेत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार असं केल्याने घरात अशांतता पसरते.

5/7

शिळं अन्न कधीही दान करू नये. नेहमी ताजे तयार केलेलं अन्न दान करावे, तरच तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात.

6/7

ज्योतिष शास्त्रानुसार चुकूनही देवी लक्ष्मीच्या मूर्तीचे दान करू नये, असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.

7/7

हिंदू धर्मात धार्मिक पुस्तकांना खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. यापैकी रामायण प्रमुख आहे. धार्मिक ग्रंथ कधीही दान करू नयेत.