Same Sex Marriage : अमित शाह-आदित्य मदिराजू यांची लव्हस्टोरी, लेकीला जन्म देऊन मांडला वेगळा विचार

Gay Couple Love Story : सुप्रीम कोर्टात समलिंगी विवाहाला कायदेशीर परवानगी मिळणार की नाही? याकडे संपूर्ण देशाचं लग्न लागून राहिलं आहे. असं असताना सोशल मीडियावर गे कपल अमित शाह आणि आदित्य मदिराजू यांची लव्हस्टोरी एक आदर्श ठरली आहे. 

| Oct 17, 2023, 12:53 PM IST

Same Sex Marriage :  आदित्य आणि अमित या गे कपलने लग्न करून आपला सुखी संसार मांडला आहे. एवढंच नव्हे तर या दोघांनी आपल्या लग्नातून आणि लेकीला जन्म देऊन जगासमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. या दोघांची पहिली भेट तिथपासून ते त्यांचा पालक होण्यापर्यंतचा प्रवास आज आपण पाहणार आहोत. 

1/7

पहिली भेट

Gay Couple Amit Shah And Aditya Madiraju Love Story Know Baby Girl Name on Same Sex Marriage Verdict

अमित शाह आणि आदित्य मदिराजू यांची पहिली भेट एका कॉमन मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये 2016 साली झाली. इथून या दोघांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली. 

2/7

Gay आहे, मुलावर प्रेम आहे...

Gay Couple Amit Shah And Aditya Madiraju Love Story Know Baby Girl Name on Same Sex Marriage Verdict

अमित आणि आदित्यने तोपर्यंत आपल्या घरच्यांना 'गे' असल्याची माहिती दिली नव्हती. अमितने आदित्यला सुरुवातीला एक मित्र म्हणून आईला भेटवलं पण नंतर आपण 'गे' असल्याची आणि आदित्यवर प्रेम असल्याची भावना व्यक्त केली.  आदित्यने 2018 मध्ये आपल्या पालकांना 'गे' असल्याचं सांगितलं. सुरुवातीला दोघांच्याही आईंना ही बाब धक्कादायक होती. पण नंतर पालकांनी त्यांचं नातं स्वीकारलं. 

3/7

हिंदू पद्धतीने लग्नाचा शाही सोहळा

Gay Couple Amit Shah And Aditya Madiraju Love Story Know Baby Girl Name on Same Sex Marriage Verdict

2019 मध्ये हे 'गे' कपल खूप चर्चेत होतं. त्याला कारण होतं यांचा विवाह.. न्यूजर्सीमध्ये दोन मित्रांनी हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली. अतिशय पारंपिक पद्धतीने या दोघांनी लग्न केलं. 

4/7

लेकीच्या जन्माचा निर्णय

Gay Couple Amit Shah And Aditya Madiraju Love Story Know Baby Girl Name on Same Sex Marriage Verdict

एप्रिल 2023 मध्ये या दोघांनी आपण पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. लग्न झाल्यापासून, या जोडप्याने बायोलॉजिकल मुलं होण्याबाबत सगळी माहिती जमा केली. त्यानंतर एग डोनर सापडल्यानंतर इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) च्या चार फेऱ्यांनंतर या जोडप्याला गोड बातमी मिळाली. मे महिन्यात यांच्या गोंडस मुलीचा जन्म झाला. 

5/7

लेकीला दिलं अनोखं नाव

Gay Couple Amit Shah And Aditya Madiraju Love Story Know Baby Girl Name on Same Sex Marriage Verdict

मे 2023 मध्ये या दोघांच्या लेकीचा जन्म झाला. 'याना शाह मदिराजू' असं नाव देतं जगासोबत गोड बातमी शेअर केली. 'गे' कपलने लेकीच्या नावातही वेगळेपण जपलं आहे. 'याना' या नावाचा अर्थ आहे देवाची परमेश्वराची भेट, देवाचा दयाळूपणा. 'याना' या नावात खूप वेगळंपण आहे. तसेच या नावाचा अर्थ आहे चंद्राची देवी.

6/7

साजरे करतात खास क्षण

Gay Couple Amit Shah And Aditya Madiraju Love Story Know Baby Girl Name on Same Sex Marriage Verdict

कोणत्याही जोडप्याप्रमाणे त्यांनाही मदर्स डे, फादर्स डे आणि सर्व सुट्टी साजरी करायची आहे. पहिल्या मुलाबद्दल दोघेही उत्सुक आहेत. अमित आणि आदित्य हे आचा 'गे' कपल नाहीत तर ते 'पालक' असल्याचं अमित सांगतो. 

7/7

जगासमोर खास आदर्श

Gay Couple Amit Shah And Aditya Madiraju Love Story Know Baby Girl Name on Same Sex Marriage Verdict

आदित्य म्हणाला, आम्हाला आशा आहे की मूल होणे अधिक सामान्य होईल.  समलिंगी जोडपे असल्यास काही फरक पडत नाही. तुम्हाला हवे तसे आयुष्य तुम्ही जगू शकता. आदित्य पुढे म्हणाला की, जे प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे मार्गदर्शक व्हावे अशी माझी इच्छा आहे. कारण आमच्यानंतर अनेकांची लग्नं झाली आहेत. आणि ते आमचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे येतात कारण आमच्यामुळे त्यांच्या पालकांना आणि कुटुंबियांना कसे तयार करायचे याबाबत माहिती घेतात.