गंगा दशहरा 3 शुभ योग; या एका उपायामुळे मिळेल 10 हजार पापांमधून मुक्ती

गंगा नदीचे पृथ्वीवरील अवतरण दिवस हा गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 30 मे रोजी साजरा केला जाणार आहे. गंगा दशहरा दिवशी 3 शुभ योग जुळून येणार आहेत. या दिवशी हा एक उपाय केल्यास  10 हजार पापांमधून मुक्ती मिळणार आहे. 

May 23, 2023, 23:34 PM IST

Ganga Dussehra 2023 Date : गंगा नदीचे पृथ्वीवरील अवतरण दिवस हा गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 30 मे रोजी साजरा केला जाणार आहे. गंगा दशहरा दिवशी 3 शुभ योग जुळून येणार आहेत. या दिवशी हा एक उपाय केल्यास  10 हजार पापांमधून मुक्ती मिळणार आहे. 

1/7

पृथ्वीवर गंगावतरण व्हावे, यासाठी राजा भगीरथाने कठोर तपश्चर्या केली. गंगेचा तीव्र प्रवाह भूतलावर आला असता, तर भूमातेचे नुकसान झाले असते. म्हणूनच महादेव शिवशंकराच्या गंगेचा प्रवाह आपल्या जटांमध्ये धारण केला आणि संतुलित प्रवाह गंगामुख येथून प्रवाहित झाला, अशी पुराणात अख्यायिका आहे. 

2/7

 गंगा  दशहराच्या दिवशी भाविक गंगेत श्रद्धेने स्नान करतात आणि सुख-समृद्धीचे वरदान मागतात. गंगेत डुबकी मारल्याने 10 हजार पापांमधून मुक्ती मिळते.

3/7

गंगा नदीत स्नान केल्याने आपल्या सर्व पापातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. 

4/7

या दिवशी गंगा स्नान करणे पवित्र मानले जाते. 

5/7

 गंगा दशहराच्या दिवशी गंगा पूजन आणि गंगेचे नामस्मरण केले जाते. 

6/7

या वर्षी गंगा दशहराच्या दिवशी तीन अतिशय शुभ योग जुळून येणार आहेत. रवियोग, सिद्धी योग आणि धन योग यांचा हा मिलाप असणार आहे. 

7/7

ज्येष्ठ महिन्यातील दशमी तिथी सोमवार, 29 मे 2023 रोजी सकाळी 11:49 वाजता सुरू होणार आहे. मंगळवारी 30 मे रोजी दुपारी 01:07 वाजता याची समाप्ती होईल. उदय तिथीमुळे गंगा दसरा हा सण 30 मे रोजी साजरा होणार आहे.