G20 Summit: इतिहासात पहिल्यांदाच परदेशी राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर वाहिली महात्मा गांधींना आदरांजली

G20 Summit : 9 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय जी20 शिखर परिषदेचा आज शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी, परिषद सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी परदेशी पाहुणे दिल्लीतील राजघाटावर दाखल झाले होते.

Sep 10, 2023, 16:01 PM IST

G20 Summit : 9 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय जी20 शिखर परिषदेचा आज शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी, परिषद सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी परदेशी पाहुणे दिल्लीतील राजघाटावर दाखल झाले होते.

1/7

पंतप्रधानांनी राष्ट्रप्रमुखांना नेले राजघाटापर्यंत

Prime Minister took the Head of State to the Rajghat

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इतर जी-20 राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधींच्या स्मारकापर्यंत घेऊन जाताना दिसत आहेत.

2/7

पहिल्यांदाच घडले असे

G20 leaders at rajghat

3/7

बायडेन यांनी वाहिली आदरांजली

joe Biden paid tribute

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो आणि इतर जी20 नेत्यांनी महात्मा गांधी स्मारक राजघाटावर आदरांजली वाहिली. 

4/7

ऋषी सुनक यांचीही आदरांजली

Tribute By Rishi Sunak

ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनी राजघाट येथील महात्मा गांधी स्मारकावर आदरांजली वाहताना दिसले. 

5/7

राजघाटावर पंतप्रधानांकडून स्वागत

Welcome by Prime Minister at Rajghat

नवी दिल्लीतील जी20 शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी राजघाटावर श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या राष्ट्रप्रमुखांचे पंतप्रधान मोदींनी खादीचा शाल घालून स्वागत केले होते

6/7

जस्टीन ट्रुडोदेखील पोहोचले होते राजघाटावर

Justin Trudeau also reached Rajghat

महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो दिल्लीतील राजघाटावर पोहोचले होते

7/7

असद बिन तारिक बिन तैमूर अल सईद

Asad bin Tariq bin Taimur Al Saeed

राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी आलेले ओमानचे उपपंतप्रधान असद बिन तारिक बिन तैमूर अल सईद यांचे खादीच्या शॉलने पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. (सर्व फोटो - PTI/AP)