Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी जय्यत तयारी सुरू, फुल ड्रेस रिहर्सलचे Photo आले समोर!
भारत यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो.
Republic Day 2023: भारत यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो.
1/5
Republic Day 2023: संविधान लागू झाल्यानंतर भारतात प्रजेची म्हणजेच जनतेची सत्ता सुरू झाली. त्यामुळे भारत खऱ्या अर्थाने आज लोकशाही देश आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झालाय. (Full dress rehearsal for Republic Day Parade at Kartavya Path in Delhi)
2/5
सोमवारी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन परेडची (Republic Day Parade) फुल-ड्रेस रिहर्सल (Full dress rehearsal) आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी विविध मंत्रालये आणि विभागांच्या सहा झलकांसह 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश असेल.
3/5
4/5