जमशेदजी टाटा ते रतन टाटा आणि आता 34 वर्षीय माया सांभाळणार TATA समूहाची धुरा? Ratan Tata सोबत खास कनेक्शन

Who is Maya Tata : 1868 मध्ये दूरदर्शी जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेला टाटा समूह टाटा कुटुंबाच्या लागोपाठ पिढ्यांच्या नेतृत्वाखाली एक जागतिक समूह म्हणून विकसित झालाय. टाटा समूहाची धुरा 34 वर्षीय माया सांभाळणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे ही माया आणि तिच रतन टाटाशी काय आहे नातं जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Oct 10, 2024, 00:49 AM IST
1/12

टाटा समूहाचे निर्माते जमशेदजी टाटा यांचा जन्म 1839 मध्ये गुजरातमधील नवसारी इथल्या एका सामान्य कुटुंबात झाला. मात्र 1870 च्या सुरुवातीपासूनच त्यांनी भारताच्या आर्थिक वातावरणात क्रांती घडवून आणणारे साम्राज्य निर्माण केलं होतं. त्यांनी त्या काळात तांत्रिक शिक्षणाला चालना दिली आणि त्याच नेतृत्त्व केलं. 

2/12

जमशेदजी टाटा पारसी धर्मगुरूंच्या कुटुंबात जन्मले झाला होता. मात्र जेव्हा त्यांचे वडील नुसेरवानजी टाटा यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी परंपरा तोडली आणि तरुण जमशेटजींवर त्यांचा प्रभाव पडला. ते 14 वर्षांचे असताना वडिलांसोबत राहण्यासाठी मुंबईला आले आणि त्यांनी उदारमतवादी कला शिक्षण पुढे नेण्यासाठी एल्फिन्स्टन महाविद्यालयात अॅडमिशन घेतली. 

3/12

त्यांचा मुलगा दोराबजी टाटा हे देखील उद्योगपती होते आणि ब्रिटीश राजवटीत टाटा समूहाची स्थापना करणारे प्रमुख व्यक्तिमत्वपैकी एक होते. त्यांचा मेहेरबानीशी विवाह झाला होता. या जोडप्याला मूलबाळ नव्हतं. मेहेरबाईंचे शिक्षण बिशप कॉटन स्कूलमध्ये झालं होतं. 

4/12

जमशेटजींचे दुसरं पुत्र सर रतन टाटा यांच्या परोपकारी प्रयत्नांनी भारतीय समाजावर अमिट छाप सोडलीय. 1925 मध्ये त्यांचा विवाह नवजबाई सेट या अग्रणी महिला संचालकाशी झाला होता. पती रतनजी टाटा यांच्या निधनानंतर त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. 

5/12

रतनजी टाटा आणि नवजबाई सेट यांचा मुलगा नवल टाटा, जे त्यांच्या व्यावसायिक कौशल्य आणि करुणेसाठी ओळखले जाता होते. त्यांनी व्यवसाय, क्रीडा प्रशासन आणि सेवाभावी प्रयत्नांमध्ये योगदान देऊन कुटुंबाचा वारसा पुढे नेला. 

6/12

सिमोन डूनॉयर यांनी लॅक्मेला प्रसिद्ध कॉस्मेटिक ब्रँड बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा मुलगा रतन नवल टाटा, टाटा समूहातील त्यांच्या नेतृत्वासाठी त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टची देखरेख करत आहे. ते 1990 पासून 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत अंतरिम अध्यक्ष होते.

7/12

नवल टाटा यांचा दुसरा मुलगा जिमी नवल टाटा, जरी विनम्र जीवन जगत असला तरी, टाटा समूहाचा विश्वस्त असायचा. ज्यामुळे कारभारीपणासाठी कुटुंबाची बांधिलकी दिसून येत होती. आपल्या नम्र जीवनशैलीसाठी ओळखले जाणारे, जिमी टाटा हे टाटा सन्सचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे धाकटे भाऊ आहेत. त्याच्या भावाच्या विपरीत, जिमी टाटा मीडिया लाजाळू होते. 

8/12

रतन टाटा यांच्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाची जबाबदारी स्वीकारली. काही महिन्यांपूर्वी एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सध्या टाटा समूहाची कमान एन चंद्रशेखर यांच्या हातात आहे. त्यांच्यानंतर या मोठ्या उद्योगसमूहाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न या ग्रुपशी संबंधित प्रत्येकाच्या मनात येत असतो. याच उत्तर समोर आलंय. 

9/12

काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की 34 वर्षीय माया टाटा ही टाटा समूहाचे नेतृत्व करण्याच्या मार्गावर आहे. ग्लिट्झच्या दुनियेपासून दूर असलेल्या माया टाटा आपल्या कामात व्यस्त असतात. सामान्य माणूस सोडा, टाटा समूहातही त्यांना फार कमी लोक तिला ओळखतात. ती प्रसिद्धीपासून कायम दूर असते.  

10/12

रतन टाटा यांच्याशी विशेष संबंध असलेल्या माया टाटा यांच्याकडे समूहाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. माया टाटा या रतन टाटांच्या भाची असल्याचं समजतं. माया टाटा यांचा जन्म नोएल टाटा आणि आलू मिस्त्री यांच्या कुटुंबात झाला. त्यांचं वडील नोएल टाटा हे रतन टाटा यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांची आई अल्लू मिस्त्री या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या बहिणी आहेत. सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या माध्यमातून मिस्त्री कुटुंबाची टाटा सन्समध्ये 18.4% हिस्सेदारी आहे. टाटा सन्समधील तिचा मोठा हिस्सा पाहता भविष्यात ती टाटा समूहाची जबाबदारी स्वीकारेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

11/12

तिने वारविक युनिव्हर्सिटी आणि यूकेमधील बेज बिझनेस स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलंय. तिने व्यावसायिक जग समजून घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात केलंय. टाटा कॅपिटलचा फ्लॅगशिप प्रायव्हेट इक्विटी फंड, टाटा अपॉर्च्युनिटीज फंडातून त्यांने आपल्या करिअरची सुरुवात केली. येथे तिने पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार संबंधांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलीय. 

12/12

मायाने टाटा डिजिटलमध्ये काम करत असताना टाटा न्यू ॲप लॉन्च करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गटासाठी ही मोठी उपलब्धी होती. जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी त्यांनी टाकलेले पाऊल या ग्रुपने दुर्लक्षित केले नाही. सध्या ती टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या सहा बोर्ड सदस्यांपैकी एक आहेत. हे कोलकाता इथे स्थित एक कर्करोग रुग्णालय आहे, ज्याचे उद्घाटन 2011 मध्ये रतन टाटा यांनी केलं होतं.