1 एप्रिलपासून तुमची कार होणार अधिक सुरक्षित

तुम्ही प्रवासात असताना आता  तुमच्या घरच्यांची काळजी होणार कमी...

Mar 15, 2021, 14:21 PM IST

मोदी सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल  पुढे टाकलं आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने  आता  1 एप्रिलपासून नवीन तयार होणाऱ्या गाड्यांमध्ये एअरबॅग बंधनकारक केलं आहे. आता  कंपन्यांना नव्या गाड्यांमध्ये 1 एप्रिलपासून ड्रायव्हर आणि बाजूच्या सीटवर एअरबॅग लावणं बंधनकारक असणार आहे. 

 

1/5

सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना कार चालवताना सुरक्षा मिळणार आहे.   

2/5

नव्या नियमांनूसार ज्या गाड्यांमध्ये एअरबॅर नाही त्यांना 31 ऑगस्तपर्यंत एयरबॅग लावणं बंधनकारक असणार आहे.  रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.   

3/5

यासाठी रस्ते आणि वाहतूक मंत्रालय गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहे.   

4/5

रस्त्यावर होणाऱ्या अपघातावर मात करण्यासाठी  एअरबॅग उत्तम उदाहरण आहे. जेव्हा कारचा अपघात होणार असेल तेव्हा, एअरबॅग तुमचा जीव वाचवू शकते.   

5/5

एअरबॅग कॉटनपासून तयार होते. एअर बॅगवर सिलिकॉनची कोटिंग असते.