'या' शहरात आजपासून 21 मार्चपर्यंत, काय राहणार बंद, काय सुरु ?

Mar 15, 2021, 11:42 AM IST
1/5

2/5

शहरात 100 ठिकाणी नाकाबंदी

शहरात 100 ठिकाणी नाकाबंदी

नागपुरात आजपासून 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणारेय. लॉकडाऊनच्या अनुषंगानं शहरात 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. शहराच्या सीमा आजपासून सील करण्यात आल्यायत. शहरात विनाकारण फिऱणाऱ्यांविरोधात कारवाई होणारेय.  गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलंय.

3/5

आठवडाभर कडक लॉकडाऊन

आठवडाभर कडक लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रकोपामुळे  नागपुरात आजपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन राहणार आहे.आजपासून 21 तारखेपर्यंत नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात हा लॉकडाऊन लागू राहील. कुणालाही विनाकारण बाहेर फिरत येणार नाही. अत्यावश्यक वगळता सर्व सेवा बंद राहणार आहे.लॉकडाऊनच उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

4/5

लॉकडाऊन हे सुरू

लॉकडाऊन हे सुरू

वैद्यकीय सेवा ,मेडिकल स्टोअर, दुध,भाजीपाला,फळ  विक्री व पुरवठा, शासकीय  कार्यालय 25 टक्के उपस्थितीत, उद्योग ,कारखाने, प्रवासी वाहतूक सेवा(50 टक्के क्षमतेने), किराणा दुकान, पशुखाद्य दुकान, निवासा करता असलेली हॉटेल,लॉज( 50 टक्के क्षमतेने)

5/5

लॉकडाऊनमध्ये हे बंद

लॉकडाऊनमध्ये हे बंद

 आठवडी बाजार बंद, मॉल्स, चित्रपटगृह,नाट्यगृह, रेस्टॉरंट,हॉटेल बंद(होम डिलिव्हरी सुरू), दारू दुकान बंद(घरपोच सुरू राहणार), शाळा, महाविद्यालय,शिकवणीवर्ग, उद्याने,व्यायामशाळा,जिम, सर्व खाजगी आस्थापना(आर्थिक लेखविषयक सोडून), सर्व धार्मिक, सांस्कृतिक,राजकीय कार्यक्रम, मंगल कार्यालय, लॉनमंध्ये होणारे लग्न समारंभ