आधी कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं अन् आता आर्थिक फटका; इशान-श्रेयसला BCCI कडून मोठा धक्का

Ishan Kishan And Shreyas Iyer: नुकतंच ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने करारातून वगळलं. मात्र यानंतर या दोन्ही खेळाडूंना अजून एक मोठा धक्का बसला आहे.

| Feb 29, 2024, 12:57 PM IST
1/7

नुकंतच बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यरला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं आहे. हा एक मोठा धक्का असतानाच या दोन्ही खेळाडूंना अजून एक धक्का बसला आहे. 

2/7

या दोघांनाही वगळल्यामुळे बीसीसीआयकडून सेंट्रल क्रॉन्ट्रॅक्टची रक्कम त्यांना मिळणार नाही.   

3/7

त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआय ज्या सुविधा देते त्यांचा लाभ घेता येणार नाहीये.   

4/7

यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही आहे. 

5/7

खेळाडूला दुखापत झाली किंवा फिटनेस वाढवायचा असेल तर ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जात असतात. 

6/7

आता या दोघांना कोणतीही दुखापत झाली तर त्याचा खर्च बीसीसीआय करणार नाही. त्यामुळे ही बाब या दोन्ही खेळाडूंसाठी मोठा धक्का असणार आहे. 

7/7

नुकतंच मोहम्मद शमीला दुखापत झाली होती आणि त्याने यावर लंडनमध्ये उपचार घेतले. त्याचा बीसीसीआयसोबत करार असल्याने संपूर्ण उपचारांचा खर्च बोर्ड करणार आहे.