IND vs ENG: धर्मशालामध्ये बदलणार टीम इंडियाची प्लेईंग 11? 'या' खेळाडूच्या डेब्यूची शक्यता

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीजमधील पाचवा आणि शेवटचा सामना 7 मार्चपासून खेळवला जाणार आहे. हा सामना धर्मशालामध्ये खेळवला जाणार आहे.

Feb 29, 2024, 11:15 AM IST
1/7

इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट सिरीजमधील पाचव्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये एका खेळाडूचा डेब्यू होण्याची शक्यता आहे.

2/7

या सामन्यामध्ये टीम इंडिया देवदत्त पडिक्कलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

3/7

देवदत्त पडिक्कलची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहून त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. त्याने भारत अ संघासाठीही चांगली कामगिरी केली आहे. 

4/7

देवदत्तने इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सिरीजमध्ये शतक झळकावलं होतं. त्याने एका सामन्यात 105 रन्स केले होते. 

5/7

पडिक्कलने भारतासाठी 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 31 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत 2227 रन्स केले आहेत.

6/7

पडिक्कलने या फॉरमॅटमध्ये 6 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 193 आहे.

7/7

पडिक्कलने 30 लिस्ट ए सामन्यात 1875 रन्स केले आहेत. या कालावधीत त्याने 8 शतकं आणि 11 अर्धशतकं केली आहेत.