Photos: शेतकरी ते 109 कोटी पगार घेणारा अधिकारी... अंबानींच्या अँटिलियाजवळ 98 कोटींचं घर; याला म्हणतात यश!

Farmer To Living Near Ambani's Antilia: तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या व्यक्तीने ज्या कंपनी समुहामध्ये इंटर्न म्हणून कॉर्परेट आयुष्याची सुरुवात केली त्याच समुहाच्या सर्वात मोठ्या कंपनचं नेतृत्व आता करत आहे. या व्यक्तीचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आजपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

Swapnil Ghangale | Aug 20, 2024, 16:18 PM IST
1/11

N Chandrasekaran

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या भारतीयाची मुलाखत घेतलीय यातच या व्यक्तीचं यश सामावलं आहे. जाणून घेऊयात कोण आहे ही व्यक्ती आणि कसा राहिला आहे तिचा प्रवास...

2/11

N Chandrasekaran

आंध्र प्रदेश सरकार राज्याच्या अर्थिक विकासासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करत आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ तसेच आघाडीच्या चेहऱ्यांचा समावेश आहे. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केलेल्या घोषणानुसार टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन हे आंध्र प्रदेश सरकारच्या या मोहिमेचे सहाय्यक प्रमुख असतील.  

3/11

N Chandrasekaran

एन. चंद्रशेखरन हे हे चंद्रा नावानेही ओळखले जातात. उद्योग जगतामध्ये चंद्रा हे नाव फारच नावाजलेले आहे. खरं तर चंद्रा यांचा इथपर्यंत प्रवास हा खरोखरच फार प्रेरणादायी आहे. सर्वसामान्य घरातून  एन. चंद्रशेखरन यांनी सुरुवात केली आणि आज ते उद्योगजगतामधील आघाडीच्या कंपनीचं नेतृत्व करत आहेत.   

4/11

N Chandrasekaran

एन. चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 साली तामिळनाडूमधील मोहानूर येथे झाला. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण सरकारी शाळेतून घेतलं. त्यानंतर त्यांना अपलाइड सायन्समध्ये कोइम्बतूर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नलॉजीमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून मास्टर्स ऑफ कंप्युटर अॅप्लिकेशनमध्ये मास्टर्स डिग्रीचं शिक्षण घेतलं.

5/11

N Chandrasekaran

एन. चंद्रशेखरन यांच्या कॉर्परेटमधील करिअरची सुरुवात टाटा कन्सलटन्सीमधून 1987 साली झाली. त्यांनी तिथे इंटर्न म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आपल्या कामाच्या जोरावर ते एक एक पायरी वर चढत सप्टेंबर 2007 मघ्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीओओ झाले. 

6/11

N Chandrasekaran

टीसीएसचे सीओओ झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी म्हणजेच ऑक्टोबर 2009 मध्ये एन. चंद्रशेखरन हे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यावेळी ते 46 वर्षांचे होते.

7/11

N Chandrasekaran

रतन टाटा यांनी टाटा सन्सच्या प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा टाटांनी संभाळलेल्या पदाची जबाबदारी एन. चंद्रशेखरन यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. रतन टाटा यांनीच एन. चंद्रशेखरन यांची या पदावर नियुक्ती केल्याचं सांगितलं जातं. 

8/11

N Chandrasekaran

मागील काही वर्षांमध्ये एन. चंद्रशेखरन यांचा टाटा समुहाच्या निर्णयावर चांगलाच प्रभाव दिसून येतो. 2019 मध्ये  एन. चंद्रशेखरन यांचा पगार 65 कोटी रुपये इतका होता. आता 2021-22 मध्ये त्यांचा पगार 109 कोटी रुपये इतका झाला आहे. 

9/11

N Chandrasekaran

2020 साली एन. चंद्रशेखरन यांनी मुंबईमध्ये एक दुमजली घर घेतल्याने ते चर्चेत आले. या घरासाठी त्यांनी 98 कोटी रुपये मोजले. हे घर मुकेश अंबानींच्या अँटिलिया या घराजवळ आहे.

10/11

N Chandrasekaran

एवढं यश मिळवल्यानंतरही एन. चंद्रशेखरन हे त्यांचं मूळ विसरलेले नाहीत. त्यांनी 'नेटफ्लिक्स'च्या 'वर्किंग : वॉट वी डू ऑल डे' या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितलं आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलं होतं. हा कार्यक्रम मे महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता.  

11/11

N Chandrasekaran

या डॉक्युमेंट्रीमध्ये एन. चंद्रशेखरन यांनी लहानपणीच्या आठवणी सांगताना शेतामधील गंमतीजंमती सांगितल्या होत्या. तसेच त्याच वेळी आपण वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं होतं, असंही ते म्हणाले.