Maharastra News : सांगोल्याच्या पठ्ठ्याची कमाल! बाजरी पिकाला चार फुटाचं कणीस, पाहा नेमका प्रकार काय?

Agriculture Marathi News सांगोल्यातील शेतकऱ्याने 4 फूट लांबीचे बाजरीच्या कणीसाचे घेतले. उत्पादन बाजरी हे कमी पावसाच्या भागात येणारे पीक आहे. 

Nov 27, 2023, 16:45 PM IST

Sangola News : बाजरीचे कणीस हे सर्वसाधारण एक फूट भर लांबीचे असते. मात्र सांगोला तालुक्यातील कोळा येथे अजब प्रकार पहायला मिळाला आहे.

1/5

राहुल वाले

राहुल वाले या शेतकऱ्याने तब्बल चार फूट लांबीच्या बाजरीच्या कणीसाचे उत्पादन घेतले आहे. 

2/5

सांगोला

या कणासाची सांगोला तालुक्यात चर्चा सुरू आहे. राजस्थान मधून त्यांनी एक हजार रुपये किलो दराने बाजरीचे गावठी बियाणे आणून पेरणी केली. 

3/5

20 गुंठ्यात केली कमाल

कमी पावसातही बाजरी जोमाने वाढली. 20 गुंठे मध्ये त्यांनी तुर्की जातीच्या बियाणाची पेरणी केली. 

4/5

बाजरीमध्ये फरक

आपल्या भागातील बाजरी आणि तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये फरक असल्याचा दावा वाले यांनी केला आहे. 

5/5

तुर्की जात

तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी मूळव्याध व शुगर असलेले नागरिक खाऊ शकतात.