Celeb Education : कोण सहावी तर कोण दहावी... तुमचे आवडते बॉलिवूड कलाकार किती शिकलेत पाहा...

Celeb Education : अभिनयाच्या जोरावर आज अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. अनेक बॉलिवूड कलाकार तरुण वर्गाचे आयकॉन (Icon) असतात. आपल्या आवडत्या कलाकारासारखे कपडे, त्यांच्यासारखी हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न अनेक तरुण-तरुणी करतात. पण एका बाबतीत या कलाकरांची कॉपी करणं कोणालाच आवडणार नाही आणि ते म्हणजे या कलाकारांचं शिक्षण. बॉलिवूडमध्ये आज अनेक कलाकार आहेत जे प्रसिद्धच्या शिखरावर आहेत. पण त्यांनी कधी कॉलेजची पायरीही चढली नाही. आज जाणून घेऊया अशाच काही कलाकारांच्या शिक्षणाबद्दल. (bollywood celeb education)

Mar 20, 2023, 13:35 PM IST
1/5

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने आपलं प्राथमिक शिक्षण ग्वालिअरमधल्या सिंधिया स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्याने मुंबईतल्या सेंट झेव्हिअर्समध्ये प्रवेश घेतला. पण तो कधी कॉलेजमध्ये कधीच गेला नाही. हायस्कूलपर्यंतच त्याने शिक्षण घेतलं.

2/5

आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्स्टनिस्ट आमिर खानने मुंबईतल्या नरसी कॉलेजमधून 12 वी पर्यंतच शिक्षण घेतलं. यानंतर त्याने शिक्षण सोडलं आणि थिएटर कंपनीत जाण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आमिरखानने पॅरानोसिया नावाच्या एक चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. 

3/5

करिश्मा कपूर

बॉलिवूडमध्ये 90 चं दशक गाजवणारी अभिनेत्री करिष्मा कपूरने फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. सोळाव्या वर्षी म्हणजे 1991 मध्ये करिष्माने 'प्रेम कैदी' नावाच्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात  केली.

4/5

रणबीर कपूर

अभिनेता रणबीर कपूर केवळ दहावीपर्यंत शिकला आहे. कपूर कुटुंबात 10 वी पर्यंत शिक्षण घेणारा रणबीर हा पहिला मुलगा आहे. त्याने मुंबईतल्या बॉम्बे स्कॉटिश शाळेतून शिक्षण घेतलं. 10 वी नंतर त्याने न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून त्याने अभिनयाचे धडे गिरवले.

5/5

अर्जुन कपूर

अभिनेत्री मलायका अरोरामुळे चर्चेत असलेला अभिनेता अर्जुन कपूरने मुंबईतल्या आर्य विद्या मंदिरातून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. अर्जुन कपूर बारावी नापास आहे. त्यानंतर त्याने शिक्षणच सोडून दिलं.