इथं तिथं नाय थेट ढगात फिरायला जायचं; एलॉन मस्क यांचे SpaceX Polaris Dawn मिशन; चौघेजण स्पेसवॉक करणार

नेमकं काय आहे एलॉन मस्क यांचे SpaceX Polaris Dawn मिशन? जाणून घेऊया.

वनिता कांबळे | Jul 07, 2024, 20:44 PM IST

SpaceX Polaris Dawn:   एलॉन मस्क नेहमीच काही ना काही तरी भन्नाट करत असतात. आता    एलॉन मस्क सर्वसामान्य माणसांना अंतराळाची सफर घडवणार आहेत. एलॉन मस्क यांनी SpaceX Polaris Dawn मिशन लाँच केले आहे. या मोहिमेअंतर्गत चौघेजण स्पेसवॉक करणार आहेत. 

 

1/7

 31 जुलै रोजी एलॉन मस्क यांचे SpaceX Polaris Dawn मिशन लाँच होणार आहे. या मोहिमेअंतर्गत थेट अंतराळात फिरण्याची संधी मिळणार आहे. 

2/7

12 जुलै रोजी SpaceX Polaris पहिल्या स्पेसटूरसाठी उड्डाण घेणार होते. मात्र, तयारी पूर्ण झालेली नव्हती. या मोहिमेअंतर्गत स्पेसटूरवर जाणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.  

3/7

SpaceX Polaris Dawn मिशन अंतर्गत उड्डाण घेणारे स्पेसक्राफ्ट पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सुमारे पाच दिवस फिरणार आहे. हे स्पेसक्राफ्ट  1,400 किमीची प्रारंभिक परिभ्रमण उंची गाठण्याचा प्रयत्न करेल. या दरम्यान, प्रवासी स्पेसक्राफ्टमधून बाहेर येऊन स्पेसवॉक करणार आहेत.   

4/7

पहिल्या टूर जाणाऱ्या चौघांनी  एलॉन मस्क यांच्या SpaceX Polaris Dawn मिशन गुंतवणुक केली आहे.  जेरेड इसाकमन, माजी हवाई दल लेफ्टनंट कर्नल स्कॉट "किड" पोटेट आणि SpaceX अभियंते सारा गिलिस आणि एना मेनन यांचा समावेश आहे.

5/7

 SpaceX Polaris Dawn या स्पेसक्राफ्टमधून चौघेजण स्पेसटूरवर जाणार आहेत. ही स्पेसटूर खूपच महागडी आहे. या स्पेसटूरवर जाणाऱ्यांसाठी खास स्पेससूट देखील तयार करण्यात आला आहे. या स्पेसक्राफ्टमध्ये वायफाय कनेक्शन देखील असेल. स्पेसक्राफ्टमधून इंटरनेटची चाचणी हा या मोहिमेचा उद्देश आहे. 

6/7

 एलॉन मस्क यांची स्पेसएक्स ही एरोस्पेस कंपनी जगातील पहिले व्यावसायिक स्पेसवॉक स्पेसक्राफ्ट लाँच करणार आहे.  31 जुलै रोजी हे SpaceX Polaris Dawn हे स्पेसक्राफ्ट लाँच होणार आहे. 

7/7

अमेरिकन स्पेस एजन्सी NASA चे अंतराळवीर अंतराळाची सफर करतात त्याप्रमाणे आता सर्वसामान्य देखील अंतराळाची सफर करु शकणार आहेत.